महिला दिनाला महिलांच्या कर्तृत्वाचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:09 AM2021-03-10T04:09:43+5:302021-03-10T04:09:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जागतिक महिला दिनाला शहरातील विविध संस्था, संघटना, औद्योगिक घराणे, राजकीय संघटना, प्रतिष्ठानांच्या वतीने महिलांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जागतिक महिला दिनाला शहरातील विविध संस्था, संघटना, औद्योगिक घराणे, राजकीय संघटना, प्रतिष्ठानांच्या वतीने महिलांच्या कर्तृत्वाचे कौतुक करणारे सोहळे पार पडले. यावेळी विविध उपक्रमांचे आयोजन झाले. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्कृत करण्यात आले. यासोबतच विविध अभियानांची पायाभरणी नागपुरातून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात आली.
शाक्य मुनी मेमोरिअल ट्रस्ट ()
नागपूर : रिंगरोड येथील नवीन नेहरूनगर येथे असलेल्या शाक्य मुनी मेमोरिअल ट्रस्टच्या सभागृहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्यात सम नेट, विदर्भ मोलकरीण संघटना, कष्टकरी जनआंदोलन यांचा सहभाग होता. यावेळी विकास तातड, रेश्मा चाफले, विलास भोंगाडे, प्राची वाहने, जसवनदा खोब्रागडे, शीला बोरकर, रेखा गणवीर, अर्चना मेश्राम, सुजाता भोंगाडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी माता-लेकींचा सत्कार करण्यात आला. देहदानाचा संकल्प करणारे नरेश वाहने व प्राची वाहने यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी रोटी, कपडा, मकान, आरोग्य, शिक्षण व वाहतूक महिलांनी सुरळीत करण्याचा संकल्प केला. संचालन प्रगती हुमणे यांनी केले. प्रास्ताविक सुजाता भोंगाडे यांनी केले तर आभार राणी यादव यांनी मानले. यावेळी सरिता जुनघरे, अश्विनी भारद्वाज, रोशन गंभीर, वैशाली पाटील उपस्थित होते.
--------------
ओबीसी महिला महासेवा संघ ()
नागपूर : ओबीसी महिला महासेवा संघ दक्षिण नागपूरच्या वतीने पिपळारोड येथील वैष्णव माता नगरात महिना दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गिरीश पांडव, ओबीसी महिला महासेवा संघ नागपूर अध्यक्ष वृंदा ठाकरे, दक्षिण नागपूर उपाध्यक्ष विद्या सेलूकर, अनिता पांडव, अनिता ठेंगरे, लता धांडे, नंदा देशमुख, कालिंदी नहाते, अर्चना भोसले, शारदा हाडगे, रंजना वाळके, रत्ना जाधव, रेखा दुबे, शीतल गौरखेडे, वाघमारे, आशा लोखंडे उपस्थित होत्या.
-----------
विदर्भ साहित्य संघ ()
नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या वतीने जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आभासी यंत्रणेद्वारे पार पडला. ग्रंथालय संचालक डॉ. अरुंधती वैद्य यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या कार्यक्रमात अनंत नांदूरकर, मोहन पांडे, वसुधा वैद्य, गायत्री मुळे यांनी त्यांच्या कवितांचे सादरीकरण केले. मंजूषा अनिल व जयश्री दाणी यांनी परिसंवादातून स्त्रीविषयक भावना मांडल्या. याप्रसंगी डॉ. स्वाती धर्माधिकारी व डॉ. रश्मी पारसकर सोवनी यांचा सत्कार करण्यात आला. परिचय डॉ. विनिता हिंगे यांनी करवून दिला. यावेळी डॉ. देव यांनीही मार्गदर्शन केले. संचालन वृषाली देशपांडे यांनी केले तर आभार सुषमा देशपांडे यांनी मानले.
.........