कलाविष्काराने रंगली प्राथमिक फेरी
By admin | Published: October 22, 2014 12:58 AM2014-10-22T00:58:05+5:302014-10-22T00:58:05+5:30
क्लासिकल, सेमीक्लासिकल आणि फोक डान्सच्या विविध प्रकारातील स्पर्धेची प्राथमिक फेरी बाल आणि युवकांच्या कलाविष्काराने रंगली. ‘पैंजनिया बोल’ या शीर्षकाखाली घेण्यात आलेल्या
‘पैंजनिया बोल’ला उत्स्फूर्त प्रतिसाद : अंतिम फेरी होणार चुरशीची
नागपूर : क्लासिकल, सेमीक्लासिकल आणि फोक डान्सच्या विविध प्रकारातील स्पर्धेची प्राथमिक फेरी बाल आणि युवकांच्या कलाविष्काराने रंगली. ‘पैंजनिया बोल’ या शीर्षकाखाली घेण्यात आलेल्या या स्पर्धेला कलावंतांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता सर्वांची नजर अंतिम फेरीकडे लागली आहे.
लोकमत कॅम्पस, युवा नेक्स्ट व हार्माेनी इव्हेन्ट्स प्रस्तूत ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. सहा ते चौदा आणि पंधरा ते पन्नास या वयोगटातील तीनशेवर स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. प्राथमिक फेरी असतानाही प्रत्येक कलावंतांच्या नृत्य शैलीचा कस लागला.
या स्पर्धेमुळे हल्ली गाजत असलेल्या रॉक डान्स, हिपपॉप, फ्री स्टाईल, डिस्को या गजबजाटात शास्त्रीय नृत्याने आपली ओळख कायम ठेवल्याचे दिसून आले. यात कलावंतांच्या नृत्यातील सच्चेपणा समोर आला. स्पर्धेत सोलो डान्समध्ये प्युअर क्लासिकलमध्ये भरतनाट्यम, कथ्यक, मोहिनीअट्टम, कुचीपुडी, सेमी क्लासिकलमध्ये फिल्मी, भजन, नॉन फिल्मी, ड्युएटमध्ये क्लासिकल, सेमिक्लासिकल आणि फोक डान्स, ग्र्रुपमध्ये क्लासिकल, सेमी क्लासिकल आणि फोक डान्सचा समावेश होता. स्पर्धेच्या सर्वच प्रकारात शंभरवर स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षण निशा ठाकूर, दीप्ती काळे यांनी केले. संचालन संचालन हार्माेनी इव्हेन्ट्सचे संचालक राजेश समर्थ आणि अंश रंदे या बालकलावंताने केले. अंतिम फेरीची तारीख लवकरच कळविण्यात येईल, अशी माहिती संयोजकांनी दिली आहे. विजेत्यांनी अधिक माहितीकरिता कॅम्पस् क्लब, लोकमत भवन, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, रामदासपेठ येथे प्रत्यक्षात किंवा फोन नं. ९९२२९१५०३५ किंवा ९८२२४०६५६२ किंवा ९८२३४६४०८० या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)