मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानवाच्या जन्मापासून ते मरेपर्यंत चिटकून राहणाऱ्या राशीचे ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे. तरीपण अनेकांचा राशी अथवा ज्योतिषावर विश्वास नसतो. मात्र ज्योतिष व राशीचे महत्त्व भारत सरकारने जाणले आहे. त्यामुळे भारत सरकारने १२ राशींचे डाक तिकीट प्रकाशित केले आहे. प्रत्येक राशीवरील किचेनसुद्धा काढण्यात आले आहे. राशीचे महत्त्व भारत सरकारनेच नाही तर आफ्रिकन देशातील सोमीलॅण्ड या देशाने चलनावर राशी साकारल्या आहेत. राशींचा हा दुर्मिळ संग्रह नागपुरातील रूपकिशोर कनोजिया यांच्या संग्रहात बघायला मिळतो आहे.ज्योतिष म्हणजे ग्रह आणि नक्षत्रांशी संबंध ठेवणारी विद्या. राशी या नक्षत्रांचा एक समूह आहे. ज्योतिष्यशास्त्राने या नक्षत्राचे अध्ययन केले. त्यात १२ नक्षत्रांची विशेषत: लक्षात घेऊन त्याला चिन्हांकित केले आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ आणि मीन या प्रत्येक राशीचे विशिष्ट चिन्ह आहे. निव्वळ भारतच नाही तर जगामध्ये ज्या देशात ज्योतिष शास्त्राचे अध्ययन होते, तिथे या राशींना महत्त्व दिले जाते. १६ व्या शतकात जहांगीर राजाने सोन्याच्या नाण्यावर राशींचे चिन्ह साकारले होते. ते नाणे आजही असल्याचे बोलले जात आहे. भारत सरकारच्या डाक विभागाने २०१० मध्ये १२ राशींवर मिनिएचर शिट प्रकाशित केली आहे. त्याचवेळी किचेनसुद्धा राशींवर काढले आहे. मिनिएचर शिट ही जन्मकुंडलीच्या बनावटीवर आधारित आहे, ज्यातून राशींचे तत्त्व प्रदर्शित करण्यात आले आहे.सोमिलॅण्डचे १२ राशींचे सिक्के हे स्टीलचे आहे. सोमिलॅण्डच्या चलनात त्याची किंमत १० सिलींग आहे. ४.५ ग्राम वजनाचा एक सिक्का आहे. २०१६ मध्ये हे सिक्के सोमिलॅण्ड सरकारने काढले होते. रूपकिशोर हे नागपूरचे प्रसिद्ध संग्राहक आहे. यापूर्वी त्यांनी राशींच्या गणपतींचे फोटो गोळा केले होते. नाशिकमध्ये त्यांना सोमिलॅण्डचे सिक्के मिळाले. त्यासाठी त्यांना काही रक्कमही मोजावी लागली. पण आजच्या घडीला नागपूरसह विदर्भात कुठेही राशींचा त्यांच्याजवळ असलेला संग्रह बघायला मिळत नाहीत. राशीच्या या विशेष संग्रहासाठी त्यांना आॅल इंडिया न्यूमेस्मेटीक प्रदर्शनीमध्ये पुरस्कृतसुद्धा करण्यात आले.माझ्याकडे वेगवेगळ्या थिमवर अनेक कलेक्शन आहे. राशी या थिमवर १२ वेगवेगळ्या साहित्याचे कलेक्शन करण्याचा माझा मानस आहे. माझ्याकडील राशींचा हा संग्रह दुर्मिळ आहे.-रूपकिशोर कनोजिया, संग्राहक
ज्योतिषशास्त्रातील राशी विदेशी चलनावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:09 AM
मानवाच्या जन्मापासून ते मरेपर्यंत चिटकून राहणाऱ्या राशीचे ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे. तरीपण अनेकांचा राशी अथवा ज्योतिषावर विश्वास नसतो. मात्र ज्योतिष व राशीचे महत्त्व भारत सरकारने जाणले आहे.
ठळक मुद्देभारत सरकारनेही जाणले राशीचे महत्त्व राशींचा संग्रह रूपकिशोरच्या संग्रहात