अविनाश ठाकरे मनपात नवे सत्तापक्षनेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:12 AM2021-02-21T04:12:03+5:302021-02-21T04:12:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनपातील सत्तापक्षनेते संदीप जाधव यांनी व्यक्तिगत कारणामुळे महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला ...

Avinash Thackeray is the new ruling party leader in Manpat | अविनाश ठाकरे मनपात नवे सत्तापक्षनेते

अविनाश ठाकरे मनपात नवे सत्तापक्षनेते

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपातील सत्तापक्षनेते संदीप जाधव यांनी व्यक्तिगत कारणामुळे महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला आहे. शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सत्तापक्षनेते पदी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ते पदभार स्वीकारणार आहेत.

आगामी महापालिका निवडणूक विचारात घेता सत्ताधारी भाजपने अविनाश ठाकरे यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसापासून ठाकरे यांची सत्तापक्षनेते पदी निवड होणार असल्याची मनपात चर्र्र्चा होती. परंतु घोषणा होत नव्हती. लवकरच विषय समित्यांच्या सभापतींची निवड केली जाणार असल्याची माहिती मनपातील पदाधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Avinash Thackeray is the new ruling party leader in Manpat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.