लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या निवडणुकीत नागपूरमध्ये ६७.१८ टक्के मतदान झाले. ६२८९ पैकी ४२२५ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान चालले. कौन्सिलच्या २५ जागांसाठी बुधवारी निवडणूक झाली.नागपूरमध्ये जिल्हा व सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ या दोन ठिकाणी मतदान केंद्रे देण्यात आली होती. जिल्हा व सत्र न्यायालयात ५५०८ पैकी ३५८१ म्हणजे ६५.०१ टक्के तर, उच्च न्यायालयात ७८१ पैकी ६४४ म्हणजे ८२.४५ टक्के मतदारांनी मतदान केले. निवडणुकीत महाराष्ट्र व गोवा येथील तब्बल १६४ उमेदवार रिंगणात होते. त्यात नागपुरातील अॅड. किशोर लांबट, अॅड. अनिल गोवारदीपे, अॅड. आसिफ कुरैशी, अॅड. विकास सिरपूरकर, अॅड. ईश्वर चर्लेवार, अॅड. सुदीप जयस्वाल, अॅड. सुनील लाचरवार, अॅड. परिजात पांडे व अॅड. अनुपकुमार परिहार या नऊ उमेदवारांचा समावेश होता. या सर्वांचे भविष्य आता पेटीबंद झाले आहे. कौन्सिलच्या गेल्या सदस्यांचा कार्यकाळ जानेवारी-२०१५ मध्येच संपला आहे. परंतु, विविध कारणे व राजकीय डावपेचांमुळे ही निवडणूक आतापर्यंत लांबली.मतदारांची गैरसोयमतदान केंद्रे कमी असल्यामुळे वकिलांची मोठी गैरसोय झाली. त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तासंतास रांगेत उभे रहावे लागले. यासंदर्भात तक्रारी करूनही निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य दखल घेतली नाही असे जिल्हा विधिज्ञ संघटनेचे सचिव नितीन तेलगोटे यांनी सांगितले.
बार कौन्सिलच्या निवडणुकीत नागपुरात ६७.१८ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:24 PM
बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या निवडणुकीत नागपूरमध्ये ६७.१८ टक्के मतदान झाले. ६२८९ पैकी ४२२५ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान चालले. कौन्सिलच्या २५ जागांसाठी बुधवारी निवडणूक झाली.
ठळक मुद्दे१६४ उमेदवारांचे भविष्य पेटीबंद : नागपुरातील ९ उमेदवारांचा समावेश