राकेश घानोडेनागपूर : विविध अनियमिततेमुळे वादग्रस्त ठरलेल्या बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येत ‘डाऊटफुल’ (त्रुटीपूर्ण) मतदान झाले आहे. कौन्सिलने आतापर्यंत २१ जिल्ह्यांतील प्रथम पसंतीक्रम मतमोजणीची आकडेवारी जाहीर केली असून त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे. २१ जिल्ह्यांमध्ये तब्बल ८५८ मते ‘डाऊटफुल’ आढळून आली आहेत.कौन्सिलच्या २५ जागांसाठी गेल्या २८ मार्च रोजी निवडणूक पार पडली. निवडणुकीत एकूण १ लाख १२ हजार ९८६ पैकी ६६ हजार ६५० नोंदणीकृत वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत मतदान कसे करावे यासंदर्भात कौन्सिलतर्फे आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही शेकडो वकील नियमानुसार मतदान करण्यात अपयशी ठरले. या निवडणुकीत एकूण १६४ उमेदवार उभे होते. मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावापुढे प्रथम, द्वितीय, तृतीय अशा पद्धतीने पसंतीक्रम नोंदवायचा होता. परंतु, अनेक वकिलांना ते जमले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणी उमेदवारांच्या नावापुढे स्वाक्षऱ्या केल्या, कुणी एकापेक्षा जास्त उमेदवारांना समान पसंतीक्रमाचे मत दिले तर, कुणी उमेदवाराचे अनुक्रमांक त्यांच्या नावापुढे लिहिले. तसेच, बºयाच मतपत्रिका कोºया व पसंतीक्रम खोडतोड केलेल्या आढळून आल्यात. कौन्सिलने अशी सर्व मते ‘डाऊटफुल’ वर्गात टाकली आहेत. गुजरात उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आर. डी. व्यास यांची एक सदस्यीय विशेष समिती या मतांचे भविष्य ठरविणार आहे. या निवडणुकीसंदर्भातील तक्रारींवर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे.उमेदवारांना मिळेल सुनावणीची संधीसेवानिवृत्त न्यायमूर्ती आर. डी. व्यास यांची विशेष समिती, प्रथम पसंतीक्रम मतमोजणी संपल्यानंतर ‘डाऊटफुल’ वर्गातील मतांवर योग्य तो निर्णय घेईल. त्यापूर्वी उमेदवारांना सुनावणीची संधी दिली जाईल. मत ग्राह्य धरले जाऊ शकते याची समितीला खात्री पटणे आवश्यक आहे. अन्यथा सर्व मते अवैध ठरवून रद्द केली जातील.अॅड. प्रवीण रणपिसे, सचिव, बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवा.
जिल्हानिहाय डाऊटफुल मते अशीजिल्हे मतदान डाऊटफुल मतेअहमदनगर २७०६ ७३अकोला १३१२ २१अमरावती १५५९ २४औरंगाबाद २९१४ ७५बिड १७०१ ३२भंडारा ०३०७ ०५बुलडाणा १०८० १२चंद्रपूर ०७०६ २०धुळे ०८७९ ०९गडचिरोली ०१२१ ००गोंदिया ०२४३ ०८दमन-दिव ००७३ ०४उत्तर गोवा १३५१ ४२दक्षिण गोवा ०६०१ ३२हिंगोली ०४८१ ०५जळगाव १७७१ ३१जालना ०६७५ १५कोल्हापूर २४९६ ४१लातुर १८३१ १५मुंबई ८३७८ २८८नागपूर ३८१९ १०६ | |