लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सावधान, खर्रा, पान खाऊन तुम्ही सार्वजनिक ठिकाणी पिचकारी माराल आणि चांगल्या जागी घाण करीत असाल तर तुमच्यावर नजर ठेवून असलेला पोलीस तुम्हाला ताब्यात घेऊ शकतो. नंतर तुमच्यावर खर्रा, पान खाऊन पिचकारी मारण्याच्या अर्थात सार्वजनिक ठिकाणी घाण करण्याच्या आरोपाखाली चालान कारवाई होऊ शकते. होय, ही अभिनव मोहीम सीताबर्डी पोलिसांनी सुरू केली असून, आज शुक्रवारी पहिल्याच दिवशी अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी घाण करू पाहणाऱ्या १५ जणांविरुद्ध चालान कारवाई केली.गेल्या आठवड्यात सीताबर्डी पोलिसांनी सीताबर्डी बाजार, व्हेरायटी चौक, झांशी राणी चौक, पंचशील चौक, लोकमत चौक परिसरात जनजागृती मोहीम राबवली होती. खर्रा, पान खाऊन जागोजागी थुंकू नका आणि सार्वजनिक ठिकाणी घाण करू नका, असा संदेश पोलिसांनी दिला होता. अशा प्रकारे घाण करणाºयांविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. त्याला जुमानत नसल्याचे पाहून ठाणेदार हेमंत खराबे यांनी साध्या वेशातील तीन पोलिसांचे एक निगराणी पथक तयार केले. या पथकाने शुक्रवारी सीताबर्डीतील विविध भागात फिरून खर्रा, पान खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºया १५ जणांना पकडले. या सर्वांना क्रमश: पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांना ठाणेदार खराबे यांनी समज दिली आणि नंतर त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीश कायद्याच्या कलम ११५ अन्वये चालान कारवाई करण्यात आली.---५०० रुपयांचा फटकाया कारवार्ईत संबंधित व्यक्तीला किमान ५०० रुपये दंडाची तरतूद आहे. ही रक्कम त्याला स्वत: कोर्टात हजर राहून भरावी लागते. यापूर्वी सीताबर्डी पोलिसांनी विविध सिग्नलवर भीक मागणारांना पकडून त्यांच्यावरही कारवाई केली. लोकांना वळण लागावे आणि त्यांना स्वच्छतेची शिस्त लागावी, हा या कारवाईमागे उद्देश असल्याचे ठाणेदार खराबे यांनी या संबंधाने लोकमतशी बोलताना सांगितले.---
सावधान... खर्रा, पान खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 9:30 PM
सावधान, खर्रा, पान खाऊन तुम्ही सार्वजनिक ठिकाणी पिचकारी माराल आणि चांगल्या जागी घाण करीत असाल तर तुमच्यावर नजर ठेवून असलेला पोलीस तुम्हाला ताब्यात घेऊ शकतो. नंतर तुमच्यावर खर्रा, पान खाऊन पिचकारी मारण्याच्या अर्थात सार्वजनिक ठिकाणी घाण करण्याच्या आरोपाखाली चालान कारवाई होऊ शकते. होय, ही अभिनव मोहीम सीताबर्डी पोलिसांनी सुरू केली असून, आज शुक्रवारी पहिल्याच दिवशी अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी घाण करू पाहणाऱ्या १५ जणांविरुद्ध चालान कारवाई केली.
ठळक मुद्दे१५ जणांविरुद्ध चालान कारवाई सीताबर्डी पोलिसांची मोहीम