लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींसंदर्भात दक्ष राहणे गरजेचे आहे. कोरोनामुळे नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. अशात लवकरच सुरू होणाऱ्या पावसाळ्यामध्ये अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी दहाही झोनमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात करून २४ तास चमू तत्पर असायला हवी. याबाबतचा आराखडा तयार करून त्या दृष्टीने कारवाई होणे गरजेचे आहे. यासाठी मनपाच्या प्रत्येक अधिकाऱ्याने येणाऱ्या कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी दिले.मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षामध्ये नैसर्गिक आपत्ती मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत आयुक्तांनी संबंधित विभागाद्वारे करण्यात येणाºया तयारीचा आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील आपात्कालीन कक्षाचे नियोजन, झोन स्तरावरील नियंत्रण कक्ष, नदी व नाले सफाई संदर्भातील कारवाई, स्ट्रॉम वॉटर ड्रेन, इमारतींचे बेसमेंट, मेनहोलवरील झाकण, जीर्ण व अतिजीर्ण घरांबाबत कार्यवाही, नदी व नाल्याच्या काठावरील अतिक्रमण, पाणी उपसण्याकरिता उपलब्ध पम्प, आपात्कालीन परिस्थितीत समाज भवन व मनपा शाळांची उपलब्धता, अग्निशमन विभागाची पूर्वतयारी या विषयांवर चर्चा करून तयारीचा यावेळी आयुक्तांनी आढावा घेतला.इन्स्टंट रिस्पॉन्स टीमआपात्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्या भागात कोणत्याही प्रकारे मनपाची सेवा खंडित होऊ नये याची कटाक्षाने काळजी घेणे आवश्यक आहे. सेवा खंडित झाल्यास ती तात्काळ सुरू करून पुढे अविरत सुरू राहावी यासाठी आपत्ती व्यवस्थापनचे नियोजन तयार असावे. मनपा मुख्यालयासह दहाही झोनमध्ये नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आाहे. तासाठी इन्स्टंट रिस्पॉन्स टीम तयार करण्यात यावी. याशिवाय शहरातील जीर्ण घरे व इमारतींची यादी तयार करून त्यावर शासन निर्णयाप्रमाणे कारवाई करण्यात यावी. तसेच शहराच्या नदीच्या आजूबाजूच्या खोल परिसरात असलेले अतिक्रमण काढण्याबाबतही कार्यवाही करा, असे निर्देश मुंढे यांनी दिले.मायक्रो लेव्हल प्लॅन तयार करापावसाळ्यापूर्वी खोल भागातील जलवाहिनी, सिवर लाईन, ट्रंक लाईन या सर्वांची स्वच्छता होणे अत्यावश्यक आहे. शहरातून वाहणाºया नाल्यांची सविस्तर माहिती काढून जास्त पाऊस आल्यास नाल्याशी संबंधित कोणता भाग जास्त बाधित होऊ शकतो, याचा अभ्यास करून आधीच त्यावर काय उपाययोजना करता येतील, याचाही मायक्रो लेव्हल प्लॅन तयार करण्याचेही निर्देश तुकाराम मुंढे यांनी दिले.
आपात्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहा : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 1:18 AM
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींसंदर्भात दक्ष राहणे गरजेचे आहे. कोरोनामुळे नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. अशात लवकरच सुरू होणाऱ्या पावसाळ्यामध्ये अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी दहाही झोनमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात करून २४ तास चमू तत्पर असायला हवी. याबाबतचा आराखडा तयार करून त्या दृष्टीने कारवाई होणे गरजेचे आहे. यासाठी मनपाच्या प्रत्येक अधिकाऱ्याने येणाऱ्या कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी दिले.
ठळक मुद्देमान्सून पूर्वतयारीचा आढावा