नागपूर - प्रभाग ५ अंतर्गत येणाऱ्या नवी मंगळवारी भागातील ३०० वर्षे जुन्या तलावाची दुरवस्था झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून तलाव दुर्गंधीयुक्त झाला आहे. या तलावाला स्वच्छ करून त्याचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पक्षातर्फे करण्यात आली आहे.
गडरलाईनचे पाणी तसेच आजूबाजूला घाण आणि कचरा व निर्माल्य यामुळे तलाव दूषित झाला आहे . यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक प्रकारच्या आजाराशी सामना करावा लागत आहे . तलावाला स्वच्छ करण्यासाठी नागरिकांनी अनेक निवेदने दिली, परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्या गेले. या तलावाला स्वच्छ करण्यात यावे, अशी मागणी आपतर्फे करण्यात आली. यासंदर्भात सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे यांना निवेदन देण्यात आले. जर एक महिन्याच्या आत कामाला सुरुवात झाली नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी विजय नंदनवार, शंकर इंगोले, रोशन डोंगरे, गुणवंत सोमकुवर, प्रदीप पौनीकर, डॉ. जयप्रकाश पौनीकर, हरेश निमजे, योगेश पराते, राज कुंभारे, नीलकंठ टाकळीकर, सुनील कोटांगले, धनराज बारापात्रे, स्वीटी इंदोरकर, दीपाली पाटील उपस्थित होते.