लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणानुसार ३ लाख ७७ हजार कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी कुटुंबातील सर्व व्यक्तींना ई-कार्ड तयार करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र अथवा कॉमन सर्व्हिस सेंटरमधून ई-कार्ड (ओळखपत्र) तयार करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे नऊ लाख पात्र लाभार्थ्यांना ९७१ आजारावर पूर्णपणे नि:शुल्क उपचार उपलब्ध होणार आहे. लाभार्थ्यांना सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय जनगणनेतील कुटुंबांच्या सदस्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठविले असून, या पत्रासह रेशनकार्ड आदी कागदपत्र, दोन पासपोर्ट साईजचे फोटो गावातील कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जमा करून लाभार्थ्यांनी आपले ई-कार्ड (ओळखपत्र) तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. ई-कार्ड तयार करण्यासाठी लाभार्थ्यांना ३० रुपये भरणे आवश्यक आहे.प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजनांची एकत्रित अंमलबजावणी करण्यात येणार असून, जिल्ह्यातील अंगिकृत शासकीय व खासगी रुग्णालयात उपचाराची सुविधा नि:शुल्क राहणार आहे. यामध्ये सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या कर्करोगाचा उपचार, मानसिक आजारावरील उपचाराचासुद्धा समावेश आहे. कुटुंबाचा समावेश असलेल्या लाभार्थ्यांच्या यादीतील व्यक्तींना आपले सरकार सेवा केंद्र व कॉमन सर्व्हिस सेंटर येथे संगणक प्रणालीद्वारे कुटुंब ई-कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी कुटुंब ई-कार्ड तयार करण्यासाठी तालुक्याचे आरोग्य सेवक, सेविका, आशा यांच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांचे पत्र वाटप करण्यात आले आहे. पात्र कुटुंबांची यादी ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही योजना शहर व ग्रामीण या दोन्ही भागांसाठी लागू असल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना शहरातील आपले सरकार सेवा पोर्टल व ग्रामीण भागातील कॉमन सर्व्हिस सेंटर येथे जाऊन ई-कार्ड तयार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
३ लाख ७७ हजार कुटुंबांना मिळणार प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 8:53 PM
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणानुसार ३ लाख ७७ हजार कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी कुटुंबातील सर्व व्यक्तींना ई-कार्ड तयार करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र अथवा कॉमन सर्व्हिस सेंटरमधून ई-कार्ड (ओळखपत्र) तयार करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
ठळक मुद्देयोजनेच्या लाभासाठी ई-कार्ड तयार करणे आवश्यकसर्व कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये ई-कार्ड तयार करण्याची सुविधापाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारजिल्ह्यातील २६ रुग्णालयात मिळणार उपचार