लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आज, रविवारी सायंकाळी ५ वाजता नागपुरात येत आहेत. सोमवारी ते विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होतील. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते पहिल्यांदाच उपराजधानीत येत असल्याने त्यांचे हे आगमन एकप्रकारे शक्तिप्रदर्शनात रुपांतरित करण्यासाठी त्यांचे समर्थक कामाला लागले आहेत. सत्ताधाऱ्यांना धडकी भरविणे हा देखील त्यामागील एक उद्देश असल्याची चर्चा आहे.भुजबळ हे महाराष्ट्र सदन घोटाळ्यात तब्बल दोन वर्षे तुरुंगात होते. सुटकेनंतर ते प्रथमच विधिमंडळ अधिवेशनाला हजेरी लावणार असून सत्ताधारी बाकावरील मंडळींना आपल्या भुजातील बळ दाखवण्याची चर्चा आहे. सुटकेनंतर पुणे येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुजबळ यांचे तडाखेबंद भाषण झाले होते. राज्यातील सरकारने भुजबळांना भ्रष्टाचाराचे पोस्टर बॉय केले तर राष्ट्रवादीने त्यांना या सरकारविरोधातील संघर्षाचे बहुजन नेते म्हणून चमकवण्याचे ठरवले आहे. पुणेरी पगडी विरुद्ध फुले पगडी हा वाद व्यासपीठावर नाट्यमयरीत्या साकारण्यामागे तेच कारण होते.भुजबळ यांचे आगमन प्रसंगी जल्लोषात स्वागत करण्याची तयारी राष्ट्रवादीने चालविली आहे. त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विशेष चमू तयार करण्यात आली असून जबाबदारी निश्चित करण्यात आल्या आहेत. समता परिषदेनेही यात पुढाकार घेतला आहे. ‘मी भुजबळ’ असे फलक घेऊन विमानतळावर स्वागतासाठी येण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. ढोल ताशांच्या गजरात स्वागत केल्यानंतर विमानतळ परिसरात भुजबळ हे कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यताही आहे.विधानसभेत काय बोलणार ? पुणे येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुजबळ यांनी सडेतोड भाषण करीत न केलेल्या चुकीची शिक्षा दिल्याचा दावा केला होता. आपण राष्ट्रवादीतच राहणार असे स्पष्ट करीत पुढील काळात सत्ताधाºयांविरोधात आक्रमक होऊन लढा देण्याचे संकेतही दिले होते. त्यामुळे आता दोन वर्षानंतर विधानसभेत पाऊल ठेवल्यानंतर भुजबळ काय बोलतात, किती आक्रमक कुणाला लक्ष्य करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
भुजबळांचे आज नागपुरात शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 1:30 AM
राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आज, रविवारी सायंकाळी ५ वाजता नागपुरात येत आहेत. सोमवारी ते विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होतील. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते पहिल्यांदाच उपराजधानीत येत असल्याने त्यांचे हे आगमन एकप्रकारे शक्तिप्रदर्शनात रुपांतरित करण्यासाठी त्यांचे समर्थक कामाला लागले आहेत. सत्ताधाऱ्यांना धडकी भरविणे हा देखील त्यामागील एक उद्देश असल्याची चर्चा आहे.
ठळक मुद्दे स्वागतासाठी राष्ट्रवादी सज्ज : सत्ताधाऱ्यांना धडकी भरविण्याचा प्रयत्न