व्हेंटिलेटर न लावताही लावले बिल : मृताच्या मुलाची मनपाकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 10:00 PM2020-10-03T22:00:26+5:302020-10-03T22:01:34+5:30

Ventilator Bill, Corona Virus, Hospital, Nagpur News खासगी कोविड हॉस्पिटलमधील एका रुग्णाला व्हेंटिलेटर न लावताही ९ हजाराप्रमाणे बिल काढले, सोबतच पाच दिवसांचा पीपीर्ई किटचा खर्च ३३ हजार तर ५० हजार रुपयांच्या चाचण्या केल्या. याबाबतची तक्रार मृत रुग्णाच्या मुलाने महानगरपालिकेकडे ११ सप्टेंबर रोजी केली. परंतु अद्यापही कोणीच उत्तर दिले नाही. यामुळे खासगी हॉस्पिटलवर वचक कुणाचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Bill charged without ventilator: Complaint of deceased's son to NCP | व्हेंटिलेटर न लावताही लावले बिल : मृताच्या मुलाची मनपाकडे तक्रार

व्हेंटिलेटर न लावताही लावले बिल : मृताच्या मुलाची मनपाकडे तक्रार

Next
ठळक मुद्देखासगी हॉस्पिटलवर वचक कुणाचा?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खासगी कोविड हॉस्पिटलमधील एका रुग्णाला व्हेंटिलेटर न लावताही ९ हजाराप्रमाणे बिल काढले, सोबतच पाच दिवसांचा पीपीर्ई किटचा खर्च ३३ हजार तर ५० हजार रुपयांच्या चाचण्या केल्या. याबाबतची तक्रार मृत रुग्णाच्या मुलाने महानगरपालिकेकडे ११ सप्टेंबर रोजी केली. परंतु अद्यापही कोणीच उत्तर दिले नाही. यामुळे खासगी हॉस्पिटलवर वचक कुणाचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अ‍ॅड. मनोज खोब्रागडे यांनी सांगितले, ६९ वर्षीय वडील मुनेश्वर खोब्रागडे यांना १८ ऑगस्ट रोजी रेडियन्स हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डात भरती केले. १९ ऑगस्ट रोजी तेथून त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल केले. उपचारादरम्यान २३ ऑगस्ट रोजी वडिलांचा मृत्यू झाला. शासनाने खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरशिवाय अतिदक्षता विभागाचा प्रतिदिवसाचा खर्च ७ हजार ५०० तर व्हेंटिलेटरसह अतिदक्षता विभागाचा खर्च ९ हजाराचा दर ठरवून दिला आहे. परंतु वडिलांना पहिल्या दिवशी सामान्य वॉर्डात ठेवले असतानाही आयसीयूचे दर लावले. येथे व्हेंटिलेटर न लावताही व्हेंटिलेटरचा दर आकारण्यात आला. शासकीय दरानुसार सामान्य वॉर्डातील पीपीई किटचा खर्च ६०० रुपये तर आयसीयूचा १२०० रुपये असताना पाच दिवसांचे ३३००० शुल्क आकारण्यात आले. औषधांमध्येही ७,८५० रुपये जास्तीचे घेतले. ज्या चाचण्यांचे बिल लावले त्याचे रिपोर्ट फार्ईलमधून गायब होते. या विषयी तक्रार केल्यावर नंतर फार्ईलमध्ये लावण्यात आले. पाच दिवसांत ५० हजार रुपयांच्या चाचण्या करण्यात आल्या. वडिलांच्या अचानक मृत्यूने बिल न पाहता हॉस्पिटलचे शुल्क पूर्ण भरले. यात हॉस्पिटलने २१ हजार रुपयांची सूटही दिली. परंतु नंतर बिल तपासले असता, शासकीय दरानुसार ८० हजार ६५० रुपये शुल्क झाले असताना १ लाख भरल्याचे लक्षात आले. याची तक्रार मनपा आयुक्त यांना ११ सप्टेंबर रोजी केली. परंतु उत्तर मिळाले नसल्याचे अ‍ॅड. खोब्रागडे यांचे म्हणणे आहे. हॉस्पिटलमधील वॉर्डातील शौचालयात पाणी, साबण व सॅनिटायझरचा वापर होत नसल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

रुग्णाला छोटे व्हेंटिलेटर लावण्यात आले होते
रुग्णाला छोटे व्हेंटिलेटर म्हणजे ‘बायपॅक’ लावण्यात आले होते. प्रत्येक उपचारापूर्वी रुग्णाचा मुलगा अ‍ॅड. खोब्रागडे यांची संमती घेतली जात होती. एकूण खर्चाच्या शुल्कातून २१ हजार रुपयांची सूटही देण्यात आली. त्यानंतरही मनपाच्या अधिकाऱ्याने ११ हजार रुपये परत करण्यास सांगितले, लवकरच ही रक्कमही त्यांना परत केली जाईल.
डॉ. मनोज पुरोहित
संचालक, रेडिएन्स हॉस्पिटल

Web Title: Bill charged without ventilator: Complaint of deceased's son to NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.