भाजप मातोश्रीवर ३० हजार पत्र पाठवून देणार ‘कलंक’ला उत्तर

By कमलेश वानखेडे | Published: July 15, 2023 04:54 PM2023-07-15T16:54:18+5:302023-07-15T16:57:22+5:30

भाजपचे युवा वॉरीयर्स सक्रीय : ‘फडणवीस महाराष्ट्राचा अभिमान’ असे पत्रात लिहिणार

BJP will send 30,000 letters to uddhav thackeray in response to 'Kalank' comment on devendra fadnavis | भाजप मातोश्रीवर ३० हजार पत्र पाठवून देणार ‘कलंक’ला उत्तर

भाजप मातोश्रीवर ३० हजार पत्र पाठवून देणार ‘कलंक’ला उत्तर

googlenewsNext

नागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली ‘नागपूरला लागलेला कलंक’ अशी टीका भाजपने चांगलीच मनावर घेतली आहे. आता या भाजपतर्फे ‘देवेंद्र फडणवीस केवळ नागपूरचाच नव्हे, तर महाराष्ट्राचा अभिमान आहे’, असे लिहिलेले ३० हजार पोस्टकार्ड मातोश्रीवर पाठविण्यात येणार आहे. भाजपचे युवा वॉरीयर्स यांनी शनिवारपासून हे अभियान सुरू केले आहे.

फडणवीस यांच्यावर विखारी टीका केल्यामुळे भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. एवढेच नव्हे तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही गंभीर इशारा दिला होता. आता भारतीय जनता युवा मोर्चाने ‘कलंक’मुळे केलेल्या अपमानाचा वचपा घेण्यासाठी मोहीम आखली आहे.माजी महापौर व मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव संदीप जोशी यांच्या उपस्थितीत फ्रिडम पार्क येथे मातोश्रीवर पत्र पाठविण्याच्या अभियानाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी जोशी म्हणाले, फडणवीस यांनी स्वकर्तुत्वाच्या भरवशावर नगरसेवक ते मुख्यमंत्री अशी वाटचाल केली. पक्षसंघटनेत पहत्वाची पदे भूषवत संघटन बळकट केले. एलएलबी, एलएलएम आणि तेसुद्धा गोल्ड मेडलिस्ट असलेले नेते आहेत. त्यांच्याजवळ विकासाचे व्हीजन आहे. मुख्यमंत्री म्हणून अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. त्यामुळे ते भाजपसह महाराष्ट्रासाठी भूषण आहेत. अशा व्यक्तिवर एवढ्या खालच्या पातळीवर जावून आरोप करणे योग्य नाही. फडणवीस हे महाराष्ट्राचे भूषण आहेत, याची जाणीव करून देत सदैव स्मरणात राहण्यासाठी भाजपतर्फे मातोश्रीवर ३० हजार पोस्टकार्ड पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: BJP will send 30,000 letters to uddhav thackeray in response to 'Kalank' comment on devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.