भाजपकडून व्यास, काँग्रेसकडून चव्हाण

By admin | Published: December 10, 2015 02:57 AM2015-12-10T02:57:22+5:302015-12-10T02:57:22+5:30

विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करताना भाजपमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत रस्सीखेच चालली.

BJP's diameter, Chavan from Congress | भाजपकडून व्यास, काँग्रेसकडून चव्हाण

भाजपकडून व्यास, काँग्रेसकडून चव्हाण

Next

शेवटच्या क्षणी अर्ज दाखल : भाजपमध्ये रस्सीखेच तर काँग्रेसमध्ये शोधाशोध
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करताना भाजपमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत रस्सीखेच चालली. शेवटी प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांचे नाव निश्चित करण्यात आले. दुसरीकडे काँग्रेसमध्ये एकाही दिग्गज नेत्याने लढण्याची तयारी न दर्शविल्यामुळे शेवटपर्यंत उमेदवाराची शोधाशोध सुरू राहिली. शेवटी शहर कार्यकारिणीचे प्रतिनिधी असलेले अशोकसिंग चव्हाण यांनी हे आव्हान स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आली.
भाजपकडून गिरीश व्यास यांच्यासह महापौर प्रवीण दटके यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, व्यास हे भाजपचे अधिकृत उमेदवार असून दटके यांचा डमी अर्ज दाखल करण्यात आल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. काँग्रेकडून अशोकसिंग चव्हाण यांच्यासह नगरसेवक संजय महाकाळकर यांनीही अर्ज दाखल केला. मात्र, चव्हाण हे अधिकृत उमेदवार असून महाकाळकर हे अर्ज परत घेतील, असे पक्षाचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी स्पष्ट केलेभाजपमध्ये उमेदवारी निश्चित करण्यात बरीच रस्सीखेच झाली. महापौर प्रवीण दटके, माजी आ. अशोक मानकर व गिरीश व्यास यांच्यात टोकाची स्पर्धा झाली. शेवटच्या दिवशी मानकर मागे पडले. दटके की व्यास, अशीच चर्चा सुरू राहिली. अर्ज भरण्याच्या दोन तासापूर्वी यावर तोडगा काढत दोन्ही दटके व व्यास या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल करायचा व यानंतर उमेदवारीवर चर्चा होईल, असेही पक्षांतर्गत ठरले. मात्र, यानंतर अर्ध्या तासातच गिरीश व्यास यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे भाजपतर्फे अधिकृतरीत्या सांगण्यात आले. गिरीश व्यास हे बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. जनसंघाच्या बूथप्रमुख या पदापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. १० वर्षे नगरसेवक, नासुप्रचे विश्वस्त, भाजपचे शहर अध्यक्ष, महामंत्री म्हणून काम केले आहे. सध्या ते पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आहेत.

Web Title: BJP's diameter, Chavan from Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.