नागपूर मनपा रणसंग्रामात भाजपचे ‘टार्गेट-१२०’; अगोदर काम करा, तिकिटाची चर्चा नंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2022 07:29 PM2022-02-15T19:29:22+5:302022-02-15T19:30:10+5:30

Nagpur News नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने १२० जागांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले असून त्यानुसार नियोजन करण्याची सूचना भाजप नेत्यांनी दिली आहे.

BJP's 'Target-120' in Nagpur Municipal Corporation battle; Work first, then discuss the ticket | नागपूर मनपा रणसंग्रामात भाजपचे ‘टार्गेट-१२०’; अगोदर काम करा, तिकिटाची चर्चा नंतर

नागपूर मनपा रणसंग्रामात भाजपचे ‘टार्गेट-१२०’; अगोदर काम करा, तिकिटाची चर्चा नंतर

Next
ठळक मुद्देप्रचाराचा अनौपचारिक शंखनाद, प्रत्येक घरी संपर्क करण्याचे निर्देश

नागपूर : महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढणार नसल्याचे स्पष्ट झाले असताना भारतीय जनता पक्षानेदेखील निवडणूक प्रचाराचा शंखनाद केला आहे. प्रभागांमधील बदलानंतर दावेदार वाढले असताना पक्षाने सद्यस्थितीत तिकिटाची मागणी करणाऱ्यांना घरोघरी जाऊन संपर्क करण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपने १२० जागांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले असून त्यानुसार नियोजन करण्याची सूचना भाजप नेत्यांनी दिली आहे.

मंगळवारी भाजपचे नवनियुक्त संयोजक व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरातील दत्तोपंत ठेंगडी सभागृहात पार पडली. या बैठकीला विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, महापौर दयाशंकर तिवारी, शहराध्यक्ष आ.प्रवीण दटके, संदीप जोशी, संजय भेंडे, अर्चना डेहनकर, सुनील मित्रा, संजय बंगाले, रामभाऊ आंबुलकर प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीदरम्यान दावेदारांची मोठी संख्या व जनतेमध्ये असलेल्या नाराजीबाबतदेखील चर्चा झाली. मागील पाच वर्षांतील कार्य जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे व त्यासाठी घरोघरी जाऊन संपर्क करणे महत्त्वाचे असल्याचा पदाधिकाऱ्यांचा सूर होता. यावेळी विविध भागांमधील भाजपच्या मजबूत व कमकुवत बाजूंवरदेखील चर्चा करण्यात आली.

तीनही पक्ष एकत्र लढले तरी अडचण नाही

यासंदर्भात शहराध्यक्ष दटके यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बैठकीत संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे स्पष्ट केले. निवडणुका तोंडावर असताना नवीन संयोजकांसमवेत बैठक आवश्यक होती. आता निवडणुकीपर्यंत नियमित बैठका चालतीलच. आम्ही आमचे उद्दिष्ट अगोदरच निश्चित केले आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे तीनही पक्ष एकत्र लढले तरी भाजपला अडचण नाही. आम्ही त्यासाठीदेखील तयार आहोत, असे त्यांनी सांगितले.

दावेदारांनी अगोदर प्रभागात फिरावे

नव्या संयोजकांची पहिल्यांदाच बैठक बोलविण्यात आली होती. प्रत्येक प्रभागात आजी-माजी नगरसेवकांसोबत पदाधिकाऱ्यांचा तिकिटासाठी दावा आहे. प्रत्येक दावेदारांनी अगोदर प्रभागात फिरावे. यासाठी संयोजक नियोजन करतील. महामंत्री, पदाधिकारी सर्वांसोबत गृहसंपर्क साधावा. पक्षाचे काम जनतेपर्यंत न्यावे. तिकिटावर चर्चा नंतर होईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Web Title: BJP's 'Target-120' in Nagpur Municipal Corporation battle; Work first, then discuss the ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.