नागपुरातील रक्तपेढ्यांमध्ये दोन-तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक

By सुमेध वाघमार | Published: May 18, 2023 06:15 PM2023-05-18T18:15:39+5:302023-05-18T18:16:17+5:30

Nagpur News उन्हाळ्यात रक्तदान शिबिरांची कमी झालेल्या संख्या व गैरसमजुतीमुळे रक्तदानाचा टक्का घसरला आहे. परिणामी, शासकीयसह खासगी रक्तपेढ्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे.

Blood banks in Nagpur only have enough blood for two-three days | नागपुरातील रक्तपेढ्यांमध्ये दोन-तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक

नागपुरातील रक्तपेढ्यांमध्ये दोन-तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक

googlenewsNext

सुमेध वाघमारे 

नागपूर : उन्हाळ्यात रक्तदान शिबिरांची कमी झालेल्या संख्या व गैरसमजुतीमुळे रक्तदानाचा टक्का घसरला आहे. परिणामी, शासकीयसह खासगी रक्तपेढ्यांमध्ये दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे. रक्तदान करण्याचे आवाहन रक्तपढ्यांनी केला आहे.


    उपराजधानित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), डागा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यासह रुग्णांना अत्याधुनिक आणि दर्जेदार सुविधा देणारी सहाशेवर खासगी रूग्णालये आहेत. यामुळे विदर्भच नाहीतर छत्तीसगड, मध्यप्रदेशातून, तेलंगाणा येथून रूग्णांचा ओढा नागपुरकडे वाढला आहे. यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळांतपणाच्या रूग्णांची संख्या अधिक आहे. यांना रक्तपुरवठा करणाऱ्या चार शासकीयसह नऊ खासगी रक्तपेढ्या आहेत. परंतु सर्वच ठिकाणी जेम-तेम रक्ताचा साठा उपलब्ध आहे. विशेषत: ‘निगेटीव्ह’ ग्रुपच्या रक्ताची चणचण आहे. काही रक्तपेढ्या  ‘निगेटीव्ह’ ग्रुपचा रक्तदाता उपलब्ध करून देण्याच्या अटीवरच या ग्रुपचे रक्त देत असल्याची माहिती आहे. इतर ग्रुपमध्ये ‘एबी’, ‘ओ’ व ‘बी’ पॉझिटीव्ह रक्ताचा साठाही जेमतेम आहे.


   - रोज मागणी हजाराची, मिळतात २०० पिशव्या
उन्हाळी सुट्या असल्याने अनेक रक्तदाते बाहेरगावी जातात. या दिवसांत रक्तदान शिबिरे कमी झालेली असतात. उन्हाळ््यात रक्तदान केल्याने शरीराला नुकसान होईल किंवा बाहेर पडल्यावर लगेच चक्कर येईल अशा प्रकारचे  गैरसमज असल्याने अनेक जण रक्तदान करण्यास कचरतात. याचा फटका रक्तपेढ्यांना व रुग्णांना बसतो. शहरात साधारण एक हजार रक्तपिशव्यांची मागणी असताना स्वत:हून रक्तदान करणाºयांकडून किंवा रुग्णांच्या नातेवाईकांकडून दिवसाकाठी २००-३०० रक्तपिशव्यांचा पुरवठा होत असल्याची माहिती आहे.

Web Title: Blood banks in Nagpur only have enough blood for two-three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.