एम्प्रेस मॉल जवळच्या मृतदेहाचा छडा लागला : मित्रांनीच केली हत्या, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 11:55 PM2020-06-09T23:55:46+5:302020-06-09T23:57:37+5:30

एम्प्रेस मॉल जवळच्या निर्जन ठिकाणी आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात अखेर गणेशपेठ पोलिसांनी यश मिळवले. राजकुमार ऊर्फ गोलू ठाकूर (वय ४५) असे मृताचे नाव असून त्याची त्याच्या मित्रांनीच हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

Body found near Empress Mall: Murder by friends, arrest of two | एम्प्रेस मॉल जवळच्या मृतदेहाचा छडा लागला : मित्रांनीच केली हत्या, दोघांना अटक

एम्प्रेस मॉल जवळच्या मृतदेहाचा छडा लागला : मित्रांनीच केली हत्या, दोघांना अटक

Next
ठळक मुद्देगणेशपेठ पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एम्प्रेस मॉल जवळच्या निर्जन ठिकाणी आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात अखेर गणेशपेठ पोलिसांनी यश मिळवले. राजकुमार ऊर्फ गोलू ठाकूर (वय ४५) असे मृताचे नाव असून त्याची त्याच्या मित्रांनीच हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
राजकुमार ठाकूर हा मूळचा रायपूर छत्तीसगड येथील रहिवासी होता. कामाच्या शोधात तो गेल्या वर्षी नागपुरात आला होता. मोलमजुरी करून तो पोट भरायचा. जानेवारी महिन्यात त्याला एक मित्र मिळाला. त्याच्यासोबत तो इतवारीच्या तीन नल चौकात जाऊन मिळेल ते काम करायचा. लॉकडाऊनमुळे काम मिळेनासे झाल्यामुळे हे दोन मित्र कुठेही भटकत रहायचे आणि कुठेही झोपायचे. आरोपी मेहबूब पठाण आणि रितिक ऊर्फ रोशनलाल बर्मा याची दोघांसोबत दोन तीन महिन्यापूर्वी ओळख झाली. त्यामुळे ठाकूर त्याचा मित्र तसेच आरोपी मेहबूब पठाण यांनी रितीक बर्मा हे चौघे एम्प्रेस मॉल जवळच्या परिसरात फूटपाथवर राहू लागले. या भागात थोडेफार काम करून ते पैसे मिळवत होते. त्यातून ते दारू विकत घेत होते. २ जूनला दुपारी दारूच्या नशेत ठाकूरचे आरोपी पठाण आणि बर्मा सोबत भांडण झाले. यावेळी ठाकूरने मारहाण केल्याचा राग मनात ठेवून आरोपी त्याचा काटा काढण्याची संधी शोधत होते. रात्रीच्यावेळी संधी साधून आरोपी पठाण आणि बर्मा या दोघांनी त्याला दगडाने ठेचून ठार मारले आणि पळून गेले. सीसीटीव्हीतून पोलिसांनी अगोदर मृताचा मित्र शोधला व त्यानंतर आरोपींना अटक केली.

Web Title: Body found near Empress Mall: Murder by friends, arrest of two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.