‘वन बूथ हंड्रेड यूथ’ बसपाची नवी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 10:57 PM2018-11-05T22:57:31+5:302018-11-05T22:58:42+5:30

बहुजन समाज पार्टी (बसपा) येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागली आहे. पक्षाच्या संघटन मजबुतीवर पुन्हा एकदा नव्याने भर दिला जात असून ‘वन बूथ हंड्रेड यूथ’ ही नवी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंबंधी कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या असून प्रत्येक कार्यकर्त्याला १०० नवीन मतदारांची नोंदणी करण्याचे टार्गेट दिले आहे.

BSP's new campaign 'One booth hundred youth' | ‘वन बूथ हंड्रेड यूथ’ बसपाची नवी मोहीम

‘वन बूथ हंड्रेड यूथ’ बसपाची नवी मोहीम

Next
ठळक मुद्देसुरेश साखरे : राज्यस्तरीय बैठकीत कार्यकर्त्यांना ‘टार्गेट’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुजन समाज पार्टी (बसपा) येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागली आहे. पक्षाच्या संघटन मजबुतीवर पुन्हा एकदा नव्याने भर दिला जात असून ‘वन बूथ हंड्रेड यूथ’ ही नवी मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंबंधी कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या असून प्रत्येक कार्यकर्त्याला १०० नवीन मतदारांची नोंदणी करण्याचे टार्गेट दिले आहे.
रविभवन येथे बसपाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत बसपाचे प्रदेश प्रभारी प्रमोद रैना, प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे, अ‍ॅड. संदीप ताजने, कृष्णा बेले प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत बसपाच्या नव्या मोहिमेबद्दल माहिती देण्यात आली. प्रत्येक मतदारसंघातील १०० कार्यकर्त्यांनी नवीन १०० मतदारांची नोंदणी केल्यास १० हजार नवीन मतदार होतील. त्याचा परिणाम म्हणजे निकाल आपल्याच बाजूने लागेल, असे गणितही यावेळी कार्यकर्त्यांना समजावून सांगण्यात आले. यासोबतच ९० दिवसाचा संघटन बांधणीचा कार्यक्रमही सांगण्यात आला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सेक्टर ते बूथ आणि प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोहोचावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. याशिवाय राज्यात आतापर्यंत १० लाख नवीन सक्रिय सदस्य बनवण्यात आले. मुंबईत पारडलली कोकण परिषद यावरही चर्चा झालीय.
याबैठकीत प्रदेश महासचिव पृथ्वी शेंडे, जितेंद्र म्हैसकर, मंगेश ठाकरे, विलास सोमकुवर, रुपेश बागेश्वर, प्रेम रोडेकर, योगेश लांजेवार, राजकुमार बोरकर, मोहन रैकवार, अ‍ॅड. सुनील डोंगरे, जागेश बांगर, दिलीप मोटघरे, दुर्वास भोयर, सुशील वासनिक, अनंता लांजेवार, चेतन पवार, दीपक पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: BSP's new campaign 'One booth hundred youth'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.