लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुद्धविचारांशी एकरूप करणाऱ्या व धम्माची महती सांगणाºया दीक्षाभूमी येथे आयोजित ‘बुद्ध महोत्सवा’त या वर्षीचे कला प्रदर्शन हे वैशिष्ट्य ठरले आहे. यात साकारलेले बुद्धकालीन सुवर्ण युग, आंबेडकरी युग आणि तथागत बुद्ध यांच्या विविध रुपातील पेंटिंग आकर्षणाचे केंद्र बनले आहे.बुद्ध महोत्सवातील कला प्रदर्शन हे तीन भागात विभागले आहे. यात बुद्धकालीन सुवर्ण युगात जगातील विविध सात ठिकाणातील चैत्य व स्तूपाची प्रतिकृती प्रसिद्ध काष्ठशिल्पकार अविनाश दिग्विजय यांनी लाकडी कोरीव कामातून साकारली आहे. मानवी जीवनासाठी आदर्श जीवनमार्ग ठरलेल्या बौद्ध धम्माचे पहिले प्रवचन सारनाथ येथे पंच भिक्खुंनी दिले. समतेच्या तत्त्वज्ञानामुळे अडीच हजार वर्षांपूर्वी संपूर्ण भारत बौद्धमय झाला होता. त्या सारनाथ स्तूपाची हुबेहूब प्रतिकृती प्रदर्शित करण्यात आली आहे. सोबत पाकिस्तानमधील स्तूप, अजंठा येथील चैत्य, अफगाणिस्तानमधील गांधार येथील चैत्य, नेपाळ काठमांडू येथील स्तूप, इंडोनेशिया येथील बोरोबुद्ध स्तूप, सांची स्तूप लक्ष वेधून घेत आहे. दुसºया भागातील ‘आंबेडकरी युग’मध्ये दिग्विजय यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांतील अभिव्यक्तीला पेनच्या स्वरूपात दाखवून समाजव्यवस्थेवर मार्मिक टीका केली आहे. यातील एका प्रतिकृतीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लक्तरे ही पेनला फाशी देताना दाखविले आहे.प्रदर्शनाच्या तिसऱ्या भागात देशातील ४० चित्रकारांनी काढलेल्या बुद्धाच्या सम्यक दृष्टीची ओळख करून दिली आहे. लालित्य फाऊंंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद पिंपरीकर यांच्या पुढाकारातून हे चित्र साकारण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या चित्रविक्रीतून गोळा झालेला निधी महिलांना स्वयंरोजगारासाठी देण्यात येणार आहे. येथेही बुद्धाची दानपारमिता हाच संदेश पेरण्याचा अनोखा उपक्रम फाऊंडेशनतर्फे राबविण्यात आला आहे.मार्बलमध्ये कोरले बुद्ध, बाबासाहेबकेरळ येथील प्रदीप कोची यांनी ‘मार्बल स्टोन’मध्ये तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व उर्गेन संघरक्षित यांचे चित्र कोरले आहे. मोठ्या परिश्रमाने कोरलेले हे चित्र पाहण्यासाठी आंबेडकरी अनुयायांची गर्दी उसळली आहे.