दीक्षाभूमीवर बुद्ध पौर्णिमा महोत्सव आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:00 AM2019-05-18T00:00:49+5:302019-05-18T00:02:04+5:30
बुध्द पोर्णिमेनिमित्त येत्या शनिवारी दीक्षाभूमीवर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुध्द पोर्णिमेनिमित्त येत्या शनिवारी दीक्षाभूमीवर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता डॉ. आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत तथागत गौतम बुध्द यांना अभिवादन करण्यात येईल. याप्रसंगी स्मारक समितीचे सचिव सदानंदजी फुलझेले यांच्यासह विलास गजघाटे, एन.आर.सुटे, डॉ.सुधीर फुलझेले, अॅड आनंद फुलझेले आदी सदस्य प्रामुख्याने उपस्थित राहतील.
सायंकाळी ६ वाजता धम्म संदेश प्रसारण मध्यवर्ती स्मारकासमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. भदंत सुरेई ससाई, भदंत नागघोष, भदंत नागवंश, धम्मसारथी उपस्थित राहतील. सायंकाळी ७ वाजता स्मारक समिती व प्रयास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुध्द आणि त्यांच्या धम्मावर आधारीत धम्मज्ञान स्पर्धा होईल. यामध्ये सुमारे ५००० विद्यार्थी सहभागी होतील. समिती व विश्व मैत्रेय बुध्दिस्ट संघ यांच्यावतीने पाच दिवसापासून सुरू असलेल्या १७० मुलांच्या बौध्द धम्म प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप यादरम्यान होईल. भन्ते थामांग, भन्ते सारीत, भन्ते सातीन, भंते सामनचाय, भन्ते आर्यहित, भन्ते वियीन ज्योती प्रामुख्याने उपस्थित राहतील. बौध्द उपासकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीचे शरद मेश्राम, प्रशांत ढेंगरे, प्रशांत डोंगरे, बंडू बहादूरे, इंद्रपाल वाघमारे यांनी केले आहे.