लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅल इंडिया अॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉच्यावतीने बौद्ध धम्माच्या स्वतंत्र कायद्याकरिता देशव्यापी आंदोलनाची आवश्यकता या विषयावर दुसऱ्या बौद्ध धम्म संविधानिक हक्क संसदेचे आयोजन येत्या २७ जून रोजी करण्यात आले आहे. दिल्ली शासनाचे सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र पाल गौतम उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. मुकुंद खैरे यांनी दिली.कमिटीच्या नागपूर शाखेच्यावतीने नुकताच विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील यावेळी उपस्थित होते. मेळाव्यामध्ये कमिटीतर्फे तयार करण्यात आलेल्या बौद्ध कायद्याच्या बिलाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेवर काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबतही चर्चा करण्यात आली. अॅड. खैरे यांनी सांगितले, एप्रिल महिन्यात दिल्ली येथे धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी दिल्ली शासनाने सकारात्मकता दाखवत राजेंद्र गौतम यांना भेटीसाठी पाठविले होते. दुसरीकडे केंद्र शासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता देशव्यापी आंदोलन करण्याची कमिटीने तयारी केल्याचे ते म्हणाले. आंदोलनाची आवश्यकता लक्षात घेता, २७ जून रोजी धम्म संसदेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र गौतम यांच्यासह धम्मगुरू भदंत महास्थवीर सारीपुत्त, भदंत कुणालकीर्ती, भदंत पंडितानंद, भदंत महामोग्गलायन, भदंत कमालधम्मो, भदंत विपश्यी, माजी आमदार उपेंद्र शेंडे, दयासागर बौद्ध आदी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मेळाव्याला बंडोपंत टेंभुर्णे, प्रा. अशोक वानखडे, प्रा. प्रमोद मेश्राम, धनराज धोपटे, चंद्रभागा पानतावणे, संगीता खोब्रागडे आदी उपस्थित होते.
बुद्धिस्ट लॉसाठी धम्मसंसद २७ ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:14 AM
आॅल इंडिया अॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉच्यावतीने बौद्ध धम्माच्या स्वतंत्र कायद्याकरिता देशव्यापी आंदोलनाची आवश्यकता या विषयावर दुसऱ्या बौद्ध धम्म संविधानिक हक्क संसदेचे आयोजन येत्या २७ जून रोजी करण्यात आले आहे. दिल्ली शासनाचे सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र पाल गौतम उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. मुकुंद खैरे यांनी दिली.
ठळक मुद्देदिल्ली सरकारचे मंत्री राजेंद्र गौतम येणार