लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरात बुद्धिस्ट थीम पार्क उभारण्यात येणार असून त्याच्या विकासासाठी ३७०.३६ कोटी रुपयाचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात आला आहे, अशी माहिती ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखा कुंभारे यांनी दिली.ड्रॅगन पॅलेस देश-विदेशातील पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय झाले आहे. गेल्या वर्षभरात एक कोटीहून अधिक पर्यटकांनी या स्थळाला भेट दिली आहे. केंद्र सरकारने दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि चिचोली असा बुद्धिस्ट सर्किट म्हणून जाहीर केला आहे. त्याच अनुषंगाने या स्थळाचा चौफेर विकास करण्याची योजना असून ड्रॅगन पॅलेसला नवे रूप देण्यासाठी त्याचा दोन स्तरावर विकास करण्यात येणार आहे. यासाठी हा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. दोन टप्प्यात याचे काम होईल. पहिल्या टप्प्यात २१४ कोटी ५५ लाख रुपये खर्च करावयाचे आहे. तर दुसऱ्या टप्प्यात १५५ कोटी ७७ लाख रुपये खर्च करण्यात येतील.विविध देशातील बुद्धस्थळांचा समावेशड्रॅगन पॅलेस परिसरात उभारण्यात येणाऱ्या बुद्धिस्ट थीम पार्कमध्ये जगभरातील विविध देशांच्या प्रमुख बुद्धस्थळांचा समावेश असणार आहे. यासोबतच ग्रंथालय, कन्वेन्शन सेंटरसह निवासाची पंचतारांकित सोय असेल. या प्रकल्पाला केंद्र शासनाने गती द्यावी, अशी अपेक्षाही सुलेखा कुंभारे यांनी केली.
ड्रॅगन पॅलेस परिसरात बुद्धिस्ट थीम पार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 10:59 PM
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरात बुद्धिस्ट थीम पार्क उभारण्यात येणार असून त्याच्या विकासासाठी ३७०.३६ कोटी रुपयाचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात आला आहे, अशी माहिती ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखा कुंभारे यांनी दिली.
ठळक मुद्देविकासासाठी ३७० कोटीचा प्रस्ताव