सीए शासन आणि करदात्यांमधील सेतू  :  आयकर आयुक्त प्रदीप मित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:29 AM2019-07-26T00:29:48+5:302019-07-26T00:32:38+5:30

शासनाच्या तरतुदी आणि धोरणांचे पालन करण्यासाठी सीए निरंतर प्रयत्न करतात. सीए वित्तीय आरोग्याचे डॉक्टर आहेत. केंद्र सरकारने त्यांच्यावर विशेष जबाबदारी दिली आहे. वित्तीय अनुशासन सुनिश्चित करण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका असते. सीए शासन आणि करदात्यांमध्ये सेतूचे काम करीत असल्याचे मत आयकर आयुक्त प्रदीप मित्रा (अपील) यांनी येथे व्यक्त केले.

CA Bridge between Government and Taxpayers: Income Tax Commissioner Pradeep Mitra | सीए शासन आणि करदात्यांमधील सेतू  :  आयकर आयुक्त प्रदीप मित्रा

चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी आयकर आयुक्त प्रदीप मित्रा, संस्थेचे अध्यक्ष सीए सुरेन दुरगकर आणि संस्थेचे पदाधिकारी.

Next
ठळक मुद्दे ‘फायनान्स बिल-२०१९’वर चर्चासत्र

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : शासनाच्या तरतुदी आणि धोरणांचे पालन करण्यासाठी सीए निरंतर प्रयत्न करतात. सीए वित्तीय आरोग्याचे डॉक्टर आहेत. केंद्र सरकारने त्यांच्यावर विशेष जबाबदारी दिली आहे. वित्तीय अनुशासन सुनिश्चित करण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका असते. सीए शासन आणि करदात्यांमध्ये सेतूचे काम करीत असल्याचे मत आयकर आयुक्त प्रदीप मित्रा (अपील) यांनी येथे व्यक्त केले.
आयसीएआयच्या नागपूर सीए संस्थेतर्फे ’फायनान्स बिल-२०१९’ यावर आयोजित एक दिवस चर्चासत्रात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. उद्घाटनप्रसंगी नागपूर सीए संस्थेचे अध्यक्ष सीए सुरेन दुरगकर, आरसीएम सीए अभिजित केळकर, सीए जुल्फेश शाह, सीए अक्षय गुल्हाने, सीए राजेश लोया, सीए संजय एम अग्रवाल, सीए गिरीश आहुजा, सीए के.पी. देवानी, सीए साकेत बागडिया, सीए हरीश रंगवानी, सीए उमंग अग्रवाल, सीए किरीट कल्याणी, सीए राठी, नवी दिल्लीचे सीए डॉ. गिरीश आहुजा आणि मुंबईचे सीए दिलीप फडके उपस्थित होते.
मित्रा म्हणाले, वेळ सर्व गोष्टींचे सार आहे. सीएंनी वेळेचे आणि कायद्याचे पालन करावे. त्यांनी ग्राहकांना शिक्षित करावे. वाढत्या जबाबदारीमुळे अधिकाऱ्यांना कागदपत्रांची आवश्यकता असते. अपील संदर्भात व्यावसायिकदृष्ट्या सीएंना लेखा आणि कर क्षेत्राची विस्तृत माहिती असते. त्यावर सीएंनी भर द्यावा. मित्रा यांनी अर्थसंकल्पातील आयकर तरतुदींमध्ये करण्यात आलेल्या बदलांची माहिती दिली. त्यांनी स्टार्टअपसाठी शासनाचे धोरण आणि फेसलेस आयटी आकलन योजनेवर प्रकाश टाकला आणि शासकीय उपलब्धींची माहिती दिली. ते म्हणाले, व्यावसायिक क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी मानव संशाधनात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.
प्रारंभी सीए सुरेश दुरगकर म्हणाले, तरतुदींचे पालन करण्यासाठी सीए विभागासोबत काम करीत आहे. नागपूर शाखेतर्फे निरंतर होणाऱ्या बदलांची माहिती देण्यासाठी सभासदांसाठी वेळोवेळी चर्चासत्र आणि कार्यशाळांचे आयोजन करते.
केळकर यांनी संस्थेच्या एसएसपी पोर्टलचा शुभारंभ आणि संचालनासह क्षेत्रीय स्तरावरील विविध उपक्रमांची माहिती दिली. गिरीश आहुजा म्हणाले, तरतुदींमध्ये अनेक बदल झाले आहेत. सीएंनी आयकर विवरण सावधतेने दाखल करावे. दिलीप फडके यांनी अप्रत्यक्ष करांमध्ये झालेल्या बदलांची माहिती दिली. उपाध्यक्ष सीए किरीट कल्याणी यांनी संचालन केले.

Web Title: CA Bridge between Government and Taxpayers: Income Tax Commissioner Pradeep Mitra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.