लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बँकिंग क्षेत्राने अलीकडच्या काळात बरेच बदल केले आहेत आणि मोठ्या कर्जदारांच्या सततच्या थकबाकीमुळे बँका कठीण अवस्थेतून जात आहेत. अनेक बँकांमधील आर्थिक घोटाळे उघडकीस आले आहेत. बँकांची विश्वासार्हता वाढविण्यात आणि बँकिंग घोटाळे उघडकीस आणण्यात सीए तांत्रिकदृष्ट्या कुशल असल्याचे प्रतिपादन आयसीएआयच्या नागपूर शाखेचे माजी अध्यक्ष सीए महेश राठी यांनी येथे केले.नागपूर शाखेतर्फे बँकांमधील आर्थिक घोटाळे, या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. राठी म्हणाले, विविध बँकिंग प्रणालीत सीए तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यांनी परीक्षण केल्यास बँकांमध्ये फसवणूक झाल्याचे उघड होऊ शकते. सार्वजनिक क्षेत्रातील बँका एकतर वैधानिक लेखापरीक्षक म्हणून किंवा समवर्ती लेखापरीक्षक म्हणून अमलात आणताना सीए सर्वोत्तम सेवा प्रदान करीत आहेत. बँका गतिशील बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करतील.नागपूर शाखेचे अध्यक्ष सीए उमंग व्ही. अग्रवाल म्हणाले, गेल्या दशकात बँकिंगमध्ये अनेक बदल झाले असून, बँकांनी घेतलेल्या जोखिमीत वाढ झाली आहे. बँकआॅडिटने आपल्याला अद्ययावत करण्याची संधी दिली. त्यामुळे बँकर्स आणि कर्ज घेणाऱ्यांमध्ये एक दुवा तयार होईल.प्रथम तांत्रिक सत्रात मुंबईचे सीए श्रीनिवास जोशी आणि दुसऱ्या तांत्रिक सत्रात डॉ. सीए टी. एस. रावळ यांनी बँकांमधील घोटाळ्यावर मत मांडले. आॅडिटदारांच्या भूमिकेवर सुधाकर अत्रे यांनी चर्चा केली. सर्व वक्त्यांनी विविध प्रश्नांचे प्रभावी पद्धतीने निरसन केले.सीए जितेन सागलानी, सीए सुरेन दुरगकर आणि सीए साकेत बागडिया यांनी चर्चासत्रातील तांत्रिंक सत्रांचे समन्वयन केले. सचिव सीए किरीट कल्याणी यांनी आभार मानले. या वेळी सीए स्वप्निल अग्रवाल, कीर्ती अग्रवाल, सीए पी.सी. सारडा, सीए प्रणव जोशी, सीए गिरीश बुटी, सीए जयंत रणवाडकर आणि १५० पेक्षा जास्त सीए उपस्थित होते.
बँकिंग घोटाळे उघडकीस आणण्यात सीए तांत्रिकदृष्ट्या कुशल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 1:06 AM
बँकिंग क्षेत्राने अलीकडच्या काळात बरेच बदल केले आहेत आणि मोठ्या कर्जदारांच्या सततच्या थकबाकीमुळे बँका कठीण अवस्थेतून जात आहेत. अनेक बँकांमधील आर्थिक घोटाळे उघडकीस आले आहेत. बँकांची विश्वासार्हता वाढविण्यात आणि बँकिंग घोटाळे उघडकीस आणण्यात सीए तांत्रिकदृष्ट्या कुशल असल्याचे प्रतिपादन आयसीएआयच्या नागपूर शाखेचे माजी अध्यक्ष सीए महेश राठी यांनी येथे केले.
ठळक मुद्दे सीए संस्थेतर्फे चर्चासत्र : बँकांची विश्वासार्हता वाढणार