४५ नागरिकांची कर्कराेग तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:08 AM2021-01-18T04:08:37+5:302021-01-18T04:08:37+5:30
खापरखेडा : नागपुरातील राष्ट्रसंत तुकडाेजी कॅन्सर हाॅस्पिटल व चिचाेली (खापरखेडा) येथील प्राथमिक आराेग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने खापरखेडा येथे ...
खापरखेडा : नागपुरातील राष्ट्रसंत तुकडाेजी कॅन्सर हाॅस्पिटल व चिचाेली (खापरखेडा) येथील प्राथमिक आराेग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने खापरखेडा येथे कर्कराेग तपासणी शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात ४५ नागरिकांची कर्कराेग तपासणी करण्यात आली असून, यातील तिघांना संदर्भ सेवा देण्यात आली.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. राहुल ठाकरे, डॉ. रंजना झिले, डॉ. उर्मित कौर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री पेठकर, डॉ. रुचा वाघ उपस्थित होत्या. यावेळी नागरिकांना कर्करोगाच्या गंभीरतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांची तपासणी करून गरजूंवर औषधोपचार करण्यात आले. डॉ. राहुल ठाकरे व त्यांच्या चमूने कर्करोग निदान मोबाईल व्हॅनमध्ये रुग्णांची तपासणी केली. शिबिरासाठी चिचाेली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.