रेल्वेत सापडला सव्वालाखाचा गांजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:09 AM2021-06-09T04:09:27+5:302021-06-09T04:09:27+5:30
नागपूर : नागपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर १ वर उभी असलेल्या विशाखापट्टणम-नवी दिल्ली एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी १,२७,४७० रुपयाचा गांजा सापडला. ...
नागपूर : नागपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर १ वर उभी असलेल्या विशाखापट्टणम-नवी दिल्ली एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी १,२७,४७० रुपयाचा गांजा सापडला. ही ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर रात्री १२.२० वाजता पोहचली. आरपीएफच्या स्टाफला माहिती मिळाली की, कोचनंबर एस-२ मध्ये ६५ क्रमांकाच्या सीटखाली बेवारस बॅग पडली आहे. माहिती मिळताच आरक्षक बबन मौर्या, भागवत बाजड तसेच आरपीएफ ठाण्याचे नागपूरचे आरक्षक मुकेश चौहान यांनी तपासणी केली. त्यांना सीटखाली दोन बेवारस बॅग सापडल्या. त्यावर कुठल्याच प्रवाशांनी हक्क दाखविला नाही. बॅगेतून गांजाचा वास येत होता. यासंदर्भात ठाण्याचे प्रभारी आर. एल. मीना यांना सूचना दिली. दोन्ही बॅगेची तपासणी केल्यावर १,२७,४७० रुपये किमतीचा १२.७४७ किलो गांजा मिळाला. एनडीएस कायद्यान्वये कारवाई करीत जप्त गांजा लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.