लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुधवारी गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ३ आणि अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करीत नकली पिस्ता बनविणाºया एका कंपनीवर धाड टाकली. येथे शेंगदाण्याला कलर करून पिस्ता बनविला जात होता. येथून १ लाख ३५ हजार १०० रुपये किमतीचे १६९० किलो शेंगदाणे जप्त करण्यात आले. बुधवारी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. की, लालगंज चकना चौक येथील नरेश बोकडे नावाच्या व्यक्तीच्या घरी अवैधपणे शेंगदाण्याला रंग लावून पिस्ता बनविण्याचा कारखाना सुरू आहे. माहितीची पुष्टी केल्यावर अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या पथकासोबत संयुक्त कारवाई करण्यात आली. गोळीबार चौक, जागनाथ बुधवरी येथे नरेश दशरथ बोकडे याच्या घरी सुरू असलेल्या कारखान्यात अवैधपणे शेंगदाण्याला कलर करून पिस्ता तयार केला जात असल्याचे आढळले. ही कारवाई पोलीस उपायुक्त (डिटेक्शन), सहायक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार, किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस निरीक्षक सी.टी. मस्के, सहायक पोलीस निरीक्षक पंकज धाडगे यांच्यासह पोलिसांनी केली.
नागपुरात नकली पिस्ता बनवणाऱ्या कंपनीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 11:32 AM
बुधवारी गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ३ आणि अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करीत नकली पिस्ता बनविणाºया एका कंपनीवर धाड टाकली.
ठळक मुद्देसावधान! शेंगदाण्यापासून बनवला जातोय पिस्ता