इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना सीबीआय कस्टडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 09:45 PM2022-03-26T21:45:15+5:302022-03-26T21:46:32+5:30

Nagpur News पेट्रोल पंपाच्या संचालकांना एक लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेले आयओसीएलचे विक्री अधिकारी सुनील गोलार यांना न्यायालयाने दोन दिवसांची, तर मुख्य व्यवस्थापक मनीष नंदले यांना तीन दिवसांची कस्टडी मंजूर केली.

CBI custody of Indian Oil Corporation Limited officials | इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना सीबीआय कस्टडी

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना सीबीआय कस्टडी

Next
ठळक मुद्देगोलारला दोन, तर नंदलेला तीन दिवसांचा सीसीआररोडगे फरार, शोधाशोध सुरू

नागपूर : पेट्रोल पंपाच्या संचालकांना एक लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेले आयओसीएलचे विक्री अधिकारी सुनील गोलार यांना न्यायालयाने दोन दिवसांची, तर मुख्य व्यवस्थापक मनीष नंदले यांना तीन दिवसांची कस्टडी मंजूर केली. आयओसीएलचे महाव्यवस्थापक एन. पी. रोडगे मात्र फरार असून, सीबीआयची पथके त्यांचा शोध घेत आहेत.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (आयओसीएल) तीन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. नागपूर आणि गोंदियात सीबीआयने शुक्रवारी केलेल्या या कारवाईमुळे आयओसीएल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील खाडीपार, गोरेगाव येथील मीरा पेट्रोलपंपाच्या मालकाला आवश्यक परवानगी देण्यासाठी आयओसीएलचे विक्री अधिकारी सुनील गोलार यांनी एक लाखाची लाच मागितली होती; तर आकाश अशोक चौधरी (गोरेगाव, गोंदिया) यांना आयओसीएलचे महाव्यवस्थापक एन. पी. रोडगे यांनी एक लाखाची लाच मागितली होती. ही लाच रोडगे यांनी मुख्य व्यवस्थापक मनीष नंदले (किरकोळ विक्री) याच्याकडे देण्यास चौधरी यांना सांगितले होते. सीबीआयला या दोन्ही तक्रारी मिळाल्यानंतर सीबीआयच्या स्थानिक युनिटचे वरिष्ठ अधीक्षक सलीम खान यांनी गुरुवारी रात्री या प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. त्यानंतर दोन वेगवेगळी पथके तयार करून एका पथकाने गोंदियात, तर दुसऱ्या पथकाने नंदलेला लाचेची रक्कम स्वीकारताना नागपुरात रंगेहात पकडले. शनिवारी या अधिकाऱ्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही प्रकरणांत स्वतंत्र गुन्हे असल्याने पोलिसांनी गोलारला दोन, तर नंदलेला तीन दिवसांची कस्टडी मंजूर केली. रोडगे फरार असून, सीबीआयचे पथक त्याचा शोध घेत आहे.

तिकडे गोंदिया, इकडे नागपूर

गोलार आणि नंदलेला जेरबंद केल्यानंतर त्यांच्यासह फरार झालेल्या रोडगेच्याही निवास आणि कार्यालयात सीबीआयच्या वेगवेगळ्या चमूने झाडाझडती घेतली. त्यात सीबीआयच्या अधिकाऱ्यांना गोलारकडे महत्त्वाची कागदपत्रे आढळली. नंदलेकडेही काही कागदपत्रे आणि ८२ हजार रुपये मिळाले. फरार असलेल्या रोडगेकडे कागदपत्रांसह लॉकरच्या तीन चाव्या आढळल्या. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्या ताब्यात घेतल्या.

----

Web Title: CBI custody of Indian Oil Corporation Limited officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.