लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत कामठी तालुक्यातील मौजा तरोडी (खुर्द) येथील प्रस्तावित ९४२ घरांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. बुधवारी नवी दिल्ली येथील निर्माण भवन येथे आयोजित केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरिबी निर्मूलन मंत्रालयांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातर्फे या प्रकल्पाकरिता विविध पातळीवर पाठपुरवठा करण्यात आला होता, ज्यामुळे या प्रकल्पास मंजुरी मिळण्यात यश प्राप्त झाले आहे.नासुप्रद्वारे निर्माण करण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना लाभ मिळणार आहे. नासुप्रद्वारे प्रस्तावित प्रकल्प राबविला जाणार आहे. ४.३४ हेक्टर जागेवर ९४२ गाळ्यांचे निर्माण करण्यात येणार आहे. ही इमारत जी प्लस ४ या स्वरूपात राहणार असून, एका इमारतीमध्ये ४० ईडब्ल्यूएस घरकूल व प्रत्येक मजल्यावर ८ ईडब्ल्यूएस घरकूल निर्माण केले जाईल. या घरकूल योजनेचे निर्माणकार्य कन्व्हेन्शनल टेक्नॉलॉजीने केले जाणार आहे. घरकुलात बेडरूम, किचन, हॉल व प्रसाधनगृहाचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकल्पातील मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे सर्व सुविधायुक्त अशी घरे यादृष्टीने हा प्रकल्प राबविला आहे.योजनेत स्टॉर्म वॉटर ड्रेन, सिवर लाईन, डब्ल्यूबीएम रोड, साईट डेव्हलपमेंट, सोसायटी कार्यालय, संरक्षण भिंत, सोलर पॉवर, रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी गोष्टींचा समावेश या ठिकाणी राहणार आहे. या प्रकल्पातील गाळ्यांची अनुमानित किंमत प्रत्येकी ७.५ लाख आखल्या गेली आहे व यावर राज्य शासनाकडून २.५ लाखाच्या अनुदानाचा समावेशदेखील आहे.नासुप्रद्वारे सद्यस्थितीत प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत मौजा वाठोडा येथे २६४ आणि ख.क्र. ६३, मौजा.तरोडी (खुर्द) येथे २३७४ गाळ्यांचे निर्माणकार्य सुरू झाले असून, मौजा वांजरी येथे ९६० गाळ्यांचे निर्माणकार्य लवकरच सुरू होणार आहे.३७५ कोटींचा प्रकल्पमौजा वाठोडा, तरोडी व वांजरी येथे विविध प्रकल्पांच्या माध्यमातून ५ हजार घरे उभारली जात आहे. वाठोडा येथील २६४ व तरोडी येथील २३७४ घरकुलांच्या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. वांजरी येथील ९६० व तरोडी येथील ९४२ घरांच्या प्रकल्पाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. या सर्व प्रकल्पांवर ३७५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.डॉ. दीपक म्हैसेकर, सभापती नासुप्र
नागपुरातील ९४२ घरकुलांच्या प्रकल्पाला केंद्राची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 9:26 PM
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत कामठी तालुक्यातील मौजा तरोडी (खुर्द) येथील प्रस्तावित ९४२ घरांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
ठळक मुद्देसर्वांसाठी घरे २०२२ : तरोडी येथे ७१ कोटींचा प्रकल्प