डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या सूचनांची केंद्राकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 11:02 PM2019-02-09T23:02:32+5:302019-02-09T23:06:44+5:30

पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी देशातील कारागृहात सध्या असलेल्या सेवा तसेच सुधारणांसंबंधात सूचविलेल्या महत्वपूर्ण बदलांची केंद्र सरकाने दखल घेतली आहे. नुसती दखलच घेतली नाही तर या अभ्यासपूर्ण सूचनांना ‘सर्वोत्कृष्ट योगदान’ च्या रुपात स्विकारून पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो,भारत सरकार, नवी दिल्ली तर्फे डॉ. उपाध्याय यांना महानिदेशक सन्मान पदक दिले आहे. हे पदक देऊन डॉ. उपाध्याय यांचा शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. अत्यंत मानाचे मानले जाणारे हे पदक प्राप्त करणारे डॉ. उपाध्याय राज्यातील एकमेव पोलिस अधिकारी होय, हे विशेष उल्लेखनीय !

Central took cognizance Dr. Bhushan Kumar Upadhyay's instructions | डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या सूचनांची केंद्राकडून दखल

डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या सूचनांची केंद्राकडून दखल

googlenewsNext
ठळक मुद्देमायक्रो मिशन प्रकल्प : दिल्लीत महानिदेशक पदकाने सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी देशातील कारागृहात सध्या असलेल्या सेवा तसेच सुधारणांसंबंधात सूचविलेल्या महत्वपूर्ण बदलांची केंद्र सरकाने दखल घेतली आहे. नुसती दखलच घेतली नाही तर या अभ्यासपूर्ण सूचनांना ‘सर्वोत्कृष्ट योगदान’ च्या रुपात स्विकारून पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो,भारत सरकार, नवी दिल्ली तर्फे डॉ. उपाध्याय यांना महानिदेशक सन्मान पदक दिले आहे. हे पदक देऊन डॉ. उपाध्याय यांचा शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. अत्यंत मानाचे मानले जाणारे हे पदक प्राप्त करणारे डॉ. उपाध्याय राज्यातील एकमेव पोलिस अधिकारी होय, हे विशेष उल्लेखनीय !
भारत सरकारने २००८ मध्ये देशभरात ‘मायक्रो मिशन' राबविले होते. कारागृहातील बंदीवान आणि कारागृहातील अंतर्गत व्यवस्थापन याबाबत पुनरावलोकन तसेच नियमांची अंमलबजावणी असा हा प्रकल्प होता. त्यावेळी डॉ. उपाध्याय कारागृह उपमहानिरीक्षक होते. कलेचे जाणकार आणि संवेदनशिल अधिकारी म्हणून सुपरिचित असलेल्या डॉ. उपाध्याय यांनी या मिशन सबंधाने नागपूर विभागातील कारागृहात कल्पक उपक्रम राबवून अनेक चांगले बदल घडवून आणले होते. यातून त्यांनी देशातील पोलीस तसेच कारागृहात आरोग्य, संवेदना, शिक्षण, वेतन, वातावरण, व्यवस्थापन आणि सुधारणा’ आदी बाबींवर डॉ. उपाध्याय यांनी प्रकाश टाकला होता. हे सर्व सहज कसे आहे, त्यासंबंधीचा अभ्यासपूर्ण लिखानासह प्रकल्पही सादर केला होता. त्याची मिशनने सकारात्मक दखल घेतली. त्यातील अनेक सूचनांची अंमलबजावणी सुरू झाली असून, त्यातून सकारात्मक परिणाम समोर येत असल्याचे पाहून पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोने डॉ. उपाध्याय यांचा शुक्रवारी दिल्लीत सत्कार केला. त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत महानिदेशक सन्मानपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले.
पोलीस अन् उपाध्याय पॅटर्न ...!
डॉ. उपाध्याय यांनी पोलीस व त्यांच्या परिवाराच्या रास्त गरजांचा अभ्यास करून आपल्या प्रकल्पात एक नियमावली दिली आहे. त्यांच्या शैक्षणिक, आरोग्य, भावनिक आणि कौटूंबिक गरजांच्या पूर्ततेचे विश्लेषण त्यांनी त्यात मांडले आहे. ते सरकारने स्विकारल्यामुळे लवकरच पोलीस नियमावली तसेच कारागृहाचे धोरण यामध्ये आमुलाग्र बदल दिसणार आहेत.
मी केलेल्या बदल आणि सुधारणांसंबंधीच्या सूचनांची शासनाने गांभीर्याने दखल घेतल्यामुळे देशभरातील अनेकांना लाभ मिळणार आहे. त्याचा अभिमान आणि आनंद वाटतो!
डॉ. भूषणकुमार उपाध्याय
पोलीस आयुक्त, नागपूर.

 

Web Title: Central took cognizance Dr. Bhushan Kumar Upadhyay's instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.