सद्भावना नगरात चेन स्नॅचिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:06 AM2021-04-15T04:06:57+5:302021-04-15T04:06:57+5:30
- दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक नागपूर : ५ वर्षांत पैसे दुप्पट देतो, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची ...
- दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक
नागपूर : ५ वर्षांत पैसे दुप्पट देतो, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची ६० हजार रुपयांनी फसवणूक केली. कळमना पोलीस ठाण्यात यासंदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी मनोहर सुंदर निसाद (४५) हे पूर्वी गुलशननगर येथे राहत होते. त्यांच्या शेजारी राहणारा आरोपी रमेश तिहारू शाहू (४८) याने बँकेत काम करतो, असे सांगून ५ वर्षांत पैसे दुप्पट करून देण्याचे प्रलोभन दाखविले. त्याच्या प्रलोभनाला बळी पडून आरोपीने ६० हजार रुपये दिले. दरम्यान, मनोहर निसार यांच्या मुलीचे लग्न जुळल्यामुळे त्यांनी आरोपीकडे पैशाची मागणी केली. पण आरोपीने फिर्यादीचे पासबुक फाडून फेकले. त्याच्यासोबत हुज्जत घातली. अखेर फिर्यादीने कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.