संघाच्या हुंकार सभेला हायकोर्टात आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 09:23 PM2018-11-19T21:23:41+5:302018-11-19T21:24:25+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हुंकार सभेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या सभेविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर येत्या बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हुंकार सभेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या सभेविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर येत्या बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. ही सभा येत्या २५ नोव्हेंबर रोजी क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. मून यांनी या सभेवर विविध आक्षेप घेतले आहेत. अयोध्या येथे राममंदिर बांधण्याचा मुद्दा पुढे रेटण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयात अयोध्यावादाचे प्रकरण प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत ही सभा आयोजित करणे बेकायदेशीर आहे, असे याचिकेत नमूद आहे.