लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हुक्का बंदीच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. चिल अॅण्ड ग्रिल रेस्टोने यासंदर्भात रिट याचिका दाखल केली आहे.याचिकेवर सोमवारी न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने विधी व न्याय विभागाचे सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव आणि राज्याचे महाधिवक्ता यांना नोटीस बजावून सहा आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्याने त्याच्या रेस्टॉरेन्टमध्ये सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ कायद्यानुसार स्मोकिंग झोन तयार केला आहे. दरम्यान, राज्य सरकारने २०१८ मध्ये कायद्यात सुधारणा करून हुक्का प्रकारावर बंदी आणली. त्यामुळे रोज २५ हजार रुपयाचा व्यवसाय बुडत आहे. हुक्का बंदी केंद्र सरकारच्या कायद्याचे उल्लंघन करणारी आहे. परिणामी हुक्का बंदी अवैध ठरवून रद्द करण्यात यावी असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. संग्राम सिरपूरकर यांनी बाजू मांडली.
हुक्का बंदीच्या वैधतेला आव्हान :हायकोर्टात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 8:54 PM
हुक्का बंदीच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. चिल अॅण्ड ग्रिल रेस्टोने यासंदर्भात रिट याचिका दाखल केली आहे.
ठळक मुद्देराज्य सरकारला नोटीस