सरकारच्या बहुजन नीतीविरोधात परिवर्तन यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:33 AM2018-04-25T01:33:18+5:302018-04-25T01:33:28+5:30

मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांनी कोरेगाव-भीमा दंगल घडवून आणल्यानंतरही सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. दंगलीची न्यायालयीन चौकशी होण्यापूर्वी भिडेला क्लीन चिट देण्यात आली. दंगलीचा सूत्रधार भिडेला अटक करून, भिडे-एकबोटेला फाशी द्यावी, तसेच सरकारच्या बहुजन नीतीविरोधात वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात २४ एप्रिल ते ३ जून दरम्यान परिवर्तन यात्रा काढण्यात आली आहे. संविधान चौकातून शिरोमणी अकाली दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिमरनजितसिंग मान यांच्या उपस्थितीत परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली.

Change journey against government's Bahujan policy | सरकारच्या बहुजन नीतीविरोधात परिवर्तन यात्रा

सरकारच्या बहुजन नीतीविरोधात परिवर्तन यात्रा

Next
ठळक मुद्देसंविधान चौकातून सुरुवात : बहुजन क्रांती मोर्चाबरोबर अनेक संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांनी कोरेगाव-भीमा दंगल घडवून आणल्यानंतरही सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. दंगलीची न्यायालयीन चौकशी होण्यापूर्वी भिडेला क्लीन चिट देण्यात आली. दंगलीचा सूत्रधार भिडेला अटक करून, भिडे-एकबोटेला फाशी द्यावी, तसेच सरकारच्या बहुजन नीतीविरोधात वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात २४ एप्रिल ते ३ जून दरम्यान परिवर्तन यात्रा काढण्यात आली आहे. संविधान चौकातून शिरोमणी अकाली दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिमरनजितसिंग मान यांच्या उपस्थितीत परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली.
ही यात्रा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामध्ये ३६७ तालुक्यात जाणार आहे. पुणे येथे ३ जून रोजी यात्रेचे समापन होणार आहे. परिवर्तन यात्रेत बहुजन क्रांती मोर्चा बरोबरच आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड, शिरोमणी अकाली दल, सेंगल अभियान, राष्ट्रीय लिंगायत मोर्चा, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय नाभिक महासंघ, सत्यशोधक मूलनिवासी वारकरी संघ, आॅल इंडिया जैन-ओबीसी आॅर्गनायझेशन, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, जमियत ए उल्मा हिंद आदी संघटनेचा सहभाग आहे. परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचा अ‍ॅट्रॉसिटीच्या विरोधात आलेला निर्णय, न्यायपालिकेतील जातीय पूर्वग्रह, शेतकरी, कष्टकरी, मजूर, विद्यार्थी, महिला, अल्पसंख्यांक यांच्यावरचे अन्याय, ईव्हीएममधील भ्रष्टाचार आदी विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे. या मोर्चात लिंगायत मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोरणेश्वर स्वामी अप्पा, प्रसिद्ध इतिहासकार प्रा. मा.म. देशमुख, आदिवासीचे राष्ट्रीय नेते सालखन मुरमु, खिश्चन धर्मगुरू डॉ. बिशप प्रदीप कांबळे, बी.एस. हस्ते, प्रा. वंदना बेंझमिन, प्रा. सुषमा भड, हाफिज अशरफ , प्रा. विलास खरात, रमेश पिसे, मौलाना शोऐब, हाफिज शमशुद्दीन, डॉ. आसिफुजमा खान आदी सहभागी झाले आहेत.

Web Title: Change journey against government's Bahujan policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.