लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोक्सो कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने बालिकेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश दिनेश सुराणा यांनी सोमवारी हा निर्णय दिला. ही घटना सदर पोलिसांच्या हद्दीतील आहे.आनंद रामाधर गुप्ता (३०) असे आरोपीचे नाव असून, तो गड्डीगोदाम येथील रहिवासी आहे. ही घटना २६ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली होती. त्यावेळी पीडित बालिका सात वर्षे वयाची होती. आरोपी एसबीआय गेस्ट हाऊसमध्ये गार्ड म्हणून कार्यरत होता. त्याने गेस्ट हाऊस परिसरात बालिकेचा विनयभंग केला. दुसºया दिवशी पोलीस तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक एम. व्ही. हिवराळे यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. कल्पना पांडे यांनी कामकाज पाहिले.
बालिकेचा विनयभंग, आरोपीला कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:18 AM
पोक्सो कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने बालिकेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश दिनेश सुराणा यांनी सोमवारी हा निर्णय दिला. ही घटना सदर पोलिसांच्या हद्दीतील आहे.
ठळक मुद्देनागपूर सत्र न्यायालय : सदरमधील घटना