मुलेही घेतील हनुमंतासारखे उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:07 AM2021-04-14T04:07:59+5:302021-04-14T04:07:59+5:30

- सद्गुरुदास महाराज : पत्रभेटच्या उन्हाळी शिबिराचे उद्घाटन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुलांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक शक्तीचा विकास ...

Children will also take a flight like Hanumanta | मुलेही घेतील हनुमंतासारखे उड्डाण

मुलेही घेतील हनुमंतासारखे उड्डाण

Next

- सद्गुरुदास महाराज : पत्रभेटच्या उन्हाळी शिबिराचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुलांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक शक्तीचा विकास व्हावा आणि त्यांनी हनुमंतासारखे उंच उड्डाण घ्यावे, असे आवाहन सद्गुरुदास महाराज यांनी केले.

कोरोना संक्रमणाच्या प्रकोपात मुलांची सगळीच दिनचर्या बाधित झाली आहे. वर्षभरापासून मुले घरीच असल्याने मुलांना उन्हाळ्याच्या सुट्यांचा आनंद घेता येत नाही. अशास्थितीत पत्रभेटच्या वतीने उन्हाळी बाल शिबिराचे आयोजन १३ ते २५ एप्रिलदरम्यान आभासी माध्यमाद्वारे करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटनही आभासी माध्यमाद्वारेच करण्यात आले. यावेळी डॉ. अनुराधा हुकरे यांनी पालकत्वावर मार्गदर्शन केले. संचालन अर्चना बक्षी यांनी केले. प्रास्ताविक अपूर्वा मार्डीकर यांनी केले. नांदेड केंद्र प्रमुख विद्या तळणीकर यांच्या मार्गदर्शनात संस्कार वर्ग होतील.

................

Web Title: Children will also take a flight like Hanumanta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.