नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे खासगी शाळा संस्थाचालकांनी वर्ग ५ ते ८ बंद करण्याची मानसिकता बनविली आहे. पुन्हा ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी पालकांसोबत चर्चा सुरू केली आहे. हुडकेश्वर रोडवरील सेंट पॉल स्कूलने सोमवारपासून ५ ते ८ चे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर अनेक अनुदानित शाळेचे संस्थाचालक जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.
संस्थाचालकांचे म्हणणे आहे की ५ ते ८ वर्गाच्या विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती कमी आहे. त्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय शाळा प्रशासन घेत आहे. अनुदानित शाळेच्या संस्थाचालक संघटनेचे पदाधिकारी रवींद्र फडणवीस यांचे म्हणणे आहे की, आम्ही जिल्हा प्रशासनाला विनंती केली आहे की, शहरात कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता केवळ दहावी व बारावीच्या वर्गालाचा परवानगी द्यावी. उर्वरित वर्ग बंद करण्यात यावे. प्रशासनाने यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही. कोरोनाचे वाढते संक्रमण व विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता वर्ग ५ ते ८ सुरू ठेवणे योग्य नाही.
- शाळेत परीक्षा सुरू
राज्य सरकारने ५ ते ८ चे वर्ग सुरू केले. पण अनेक शाळेतील विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहत नाही. मात्र सध्या शाळांच्या परीक्षा सुरू आहे. त्यासाठी मुलांना शाळेत बोलाविल्या जात आहे.