लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील २४ तासांत गडचिराेलीमध्ये पावसाने जाेरदार धडक दिली. शनिवारी सकाळपर्यंत गडचिराेली जिल्ह्यात ३९.२ मिमी पावसाची नाेंद झाली. दुसरीकडे चंद्रपूर शहर काेरडे असले तरी जिल्ह्यात इतर भागांपैकी ब्रह्मपुरी परिसरात मुसळधार पाऊस झाला. नागपुरात मात्र आकाशात ढगांची गर्दी जमली असली तरी दिवसभर पावसाने उघाड दिला. मात्र सकाळपर्यंत २३.६ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली.
नागपुरात शनिवारी सकाळच्या काळात थाेड्या वेळासाठी सूर्य तापल्यासारखी स्थिती हाेती. त्यानंतर मात्र आकाश ढगांनी आच्छादले. मात्र पावसाने दिवसभर हजेरी लावली नाही. त्यामुळे तापमानात ३.९ अंशांची वाढ हाेऊन २९.५ अंश नाेंदविले गेले. जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला, तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडल्याची माहिती आहे. किमान तापमान १.७ अंशाने घटून २३.४ अंश नाेंदविण्यात आले. जिल्ह्यात आतांपर्यंत ५८०.२ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. दरम्यान, गडचिराेलीमध्ये शुक्रवारपासूनच पावसाच्या सरी बरसल्या. शनिवारीही हा जाेर कायम हाेता. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरीमध्ये सकाळपर्यंत २७.२ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. येथे शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप चालली हाेती. विदर्भातील अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळमध्ये ० मिमी पावसाची नाेंद झाली. इतर जिल्ह्यात कुठे जाेरदार तर कुठे तुरळक पाऊस झाला. अकाेला २.६ मिमी तर वर्धामध्ये ४.४ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील २४ तास सर्वच जिल्ह्यात आकाश ढगांनी दाटलेले राहील आणि पुढचे चार दिवस काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस हाेण्याचा अंदाज व्यक्त केला.
विभागातील पाऊस
जिल्हा सकाळपर्यंत पाऊस आतापर्यंतची नाेंद
नागपूर २३.६ मिमी ५७९.२ मिमी
वर्धा ४.४ ५०७.९
भंडारा २१.४ ५७२.१
गाेंदिया २१.७ ५४३.६
चंद्रपूर ०.० ७६९.४
गडचिराेली ३९.२ ६१५.९
विदर्भातील प्रमुख प्रकल्पांचा जलसाठा
प्रकल्प आजचा साठा (दलघमी) टक्के
काटेपूर्णा ७१.१८ ६९.३२
ऊर्ध्व वर्धा ४४१.६६ ५८.०५
खडकपूर्णा ७९.३५ ५६.५५
बेंबळा १४२.४३ ६६.८९
इसापूर ९५८.५९ ६६.७६
अरुणावती १४६.७८ ६९.५९
नागपूर विभाग
गाेसेखुर्द ७०७.७७ ४०.७८
बावनथडी १३० ३०.८७
आसाेलामेंढा ४८.०३ ७१.४४
सिरपूर ३२.४३ १३.२३
इटियाडाेह १६२.०९ ३०.९५
ताेतलाडाेह ८००.४४ ६३.९६
खिंडसी ३५.०२ ३४.१८
वडगाव ९९.०१ ६१.१६
नांद ३१.८४ ४२.९५
कामठी खैरी १२४.०९ ५९.९३