लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानकापूर येथे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले क्रीडा संकुल व रेशीमबाग मैदान यांचा लग्न समारंभ, राजकीय सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे इत्यादीसाठी उपयोग केला जात आहे. यासंदर्भात बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्यातील मुद्दे लक्षात घेता शासनाला यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.कस्तूरचंद पार्क मैदानाच्या दूरवस्थेसंदर्भातील प्रकरणात न्यायालय मित्र अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी हा अर्ज दाखल केला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, या अर्जासह मनपाच्या हेरिटेज समितीशी संबंधित मुद्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. समितीच्या अध्यक्षांचे निधन झाल्यामुळे हे पद रिक्त आहे. तसेच, समितीच्या काही सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे असे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने ही बाब रेकॉर्डवर घेऊन मनपाला चार आठवड्यांमध्ये अध्यक्ष व नवीन सदस्यांची नियुक्ती करण्याचा आदेश दिला.पार्किंगपूर्वी परवानगी घेण्याची ग्वाहीविधिमंडळ अधिवेशन काळात नागपुरात येणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची वाहने पार्क करण्यासाठी शासन कस्तूरचंद पार्क येथील जागा आरक्षित करते. कस्तूरचंद पार्क हेरिटेज आहे. त्यामुळे या ठिकाणी जड वाहने पार्क करता येत नाही. न्यायालयाने गेल्या तारखेला याबाबत काही धोरण आहे काय अशी विचारणा शासनाला केली होती. त्यावर भूमिका मांडताना शासनाने यापुढे हेरिटेज समितीची परवानगी मिळाल्यानंतरच कस्तूरचंद पार्कवर अधिकाऱ्यांची वाहने पार्क करू, अशी ग्वाही न्यायालयाला दिली.
नागपुरातील क्रीडा संकुल, रेशीमबाग मैदानाचा व्यावसायिक उपयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 7:26 PM
मानकापूर येथे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले क्रीडा संकुल व रेशीमबाग मैदान यांचा लग्न समारंभ, राजकीय सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे इत्यादीसाठी उपयोग केला जात आहे. यासंदर्भात बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्यातील मुद्दे लक्षात घेता शासनाला यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.
ठळक मुद्देहायकोर्टात अर्ज : उत्तर देण्याचा शासनाला आदेश