आयुक्त मुंढेंनी ठोठावला दुकानदारांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 10:54 PM2020-07-21T22:54:23+5:302020-07-21T22:57:06+5:30

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत देण्यात आलेल्या सवलतीदरम्यान लॉकडाऊनचे नियम पाळा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जा, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंढे यांनी सदर, इंदोरा, जरीपटका भागातील बाजारांचा दौरा करून नियमांची पायमल्ली करणाऱ्या अनेक दुकानदारांवर दंड ठोठावला.

Commissioner Mundhe slaps shopkeepers | आयुक्त मुंढेंनी ठोठावला दुकानदारांना दंड

आयुक्त मुंढेंनी ठोठावला दुकानदारांना दंड

Next
ठळक मुद्देसदर, इंदोरा, जरीपटका व गांधीबाग भागातदुकानांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत देण्यात आलेल्या सवलतीदरम्यान लॉकडाऊनचे नियम पाळा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जा, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंढे यांनी सदर, इंदोरा, जरीपटका भागातील बाजारांचा दौरा करून नियमांची पायमल्ली करणाऱ्या अनेक दुकानदारांवर दंड ठोठावला.
सायंकाळी ५ वाजता ते थेट सदर बाजार परिसरात पोहोचले. तेथे कराची गलीमध्ये अतिक्रमण करून दुकान थाटणाऱ्या एका व्यक्तीवर १० हजारांचा दंड ठोठावला. सदर बाजार परिसरात स्वत: फिरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगलेच दरडावले. मंगळवारी कॉम्प्लेक्स समोर फुटपाथवर वाहने लावलेली त्यांना आढळली. या सर्व वाहनधारकांवर कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले. यानंतर त्यांनी इंदोरा, जरीपटका, नारा रोड या भागात पाहणी केली. तेथेही त्यांना नियमांचे उल्लंघन होत असताना आढळले. या भागातीलही अनेक दुकानदारांवर १० हजारांचा दंड ठोठावला. कस्तुरचंद पार्कसमोरील दोन मोठ्या शोरूमवर रात्री ७.३० वाजतापर्यंत दुकाने सुरू ठेवली म्हणून दंडात्मक कारवाई केली.

मनपा कर्मचाऱ्यांवरही कारवाई
तपासणी करताना दुचाकीवर डबलसीट जाणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अडविले. तिने ओळखपत्र दाखवीत आपण शासकीय सेवेत असल्याचे सांगितले. ते ओळखपत्र महापालिकेचे असल्याचे पाहून मुंढे यांनी स्वत: ठेवून घेतले. ‘नियम सर्वांसाठी सारखेच’ असे म्हणत उद्या मनपा कार्यालयात येऊन ओळखपत्र घेऊन जा, असे सांगितले.

Web Title: Commissioner Mundhe slaps shopkeepers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.