नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूकडून नुकसान भरपाई वसूल करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 09:26 PM2019-02-09T21:26:47+5:302019-02-09T21:32:10+5:30

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) च्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात तोडफोड केल्यानंतर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसाठी हे प्रकरण अडचणीचे ठरणार आहे. कारण यासंदर्भात राज्यपाल व कुलपती, उच्च व तंत्र शिक्षा निदेशालयाचे निदेशक व गृह विभागाला तक्रार करण्यात आली आहे.

Compensation should recover from the Vice-Chancellor of Nagpur University | नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूकडून नुकसान भरपाई वसूल करावी

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूकडून नुकसान भरपाई वसूल करावी

Next
ठळक मुद्देएबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हंगामामुळे वाढला वाद राज्यपाल व कुलपती यांच्याकडे केली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) च्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात तोडफोड केल्यानंतर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसाठी हे प्रकरण अडचणीचे ठरणार आहे. कारण यासंदर्भात राज्यपाल व कुलपती, उच्च व तंत्र शिक्षा निदेशालयाचे निदेशक व गृह विभागाला तक्रार करण्यात आली आहे.
डॉ. अभिषेक हरदास यांनी तक्रारीत स्पष्ट म्हटले आहे की, विद्यापीठाच्या झालेल्या तोडफोडीसाठी अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविण्यात यावे. तोडफोडीच्या घटनेनंतर विद्यापीठाने कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे सार्वजनिक संपत्तीच्या झालेल्या नुकसानापोटी भरपाई ही कुलगुरू यांच्याकडून वसूल करण्यात यावी. या तक्रारीत महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अ‍ॅक्टचा हवाला देत स्पष्ट केले की, विद्यापीठाला ४५ दिवसाच्या आत निकाल घोषित करणे गरजेचे आहे. वेळेत निकाल घोषित करू न शकल्यास त्याची माहिती राज्यपाल व कुलपती यांना देणे गरजेचे आहे. पण विद्यापीठ प्रशासनाने अशी कुठलीही माहिती राजभवनला दिलेली नाही. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात तक्रार न करता, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले आहे. विद्यापीठाची भूमिका लक्षात घेता, राज्य सरकारने तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. कुलगुरु यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात यावी. शुक्रवारी एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी बी-कॉम अभ्यासक्रमाच्या निकालावरून विद्यापीठात निदर्शने केली होती. या दरम्यान जोरदार तोडफोड करण्यात आली होती.

Web Title: Compensation should recover from the Vice-Chancellor of Nagpur University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.