लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासन निर्णयानुसार खासगी ट्रॅव्हल्स बसेस सदर कमाल भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारत असल्यास प्रवाशांनी पुराव्यासहित प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर (शहर) यांच्याकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर यानी पत्रकाद्वारे कळविले आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संर्वगासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या ५० टक्केपेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर शासनाने २७ एप्रिल २०१८ रोजी शासन निर्णय जारी करून निश्चित केले आहेत.गेल्या महिन्यात दिवाळी-दसºयानिमित्त ट्रॅव्हल्स कंपन्यांनी आपल्या बसच्या दरांमध्ये प्रचंड वाढ केली होती. काही ठिकाणी मर्यादेबाहेर प्रवासी बसमध्ये कोंबले होते. सीटर व स्लीपर बसमध्ये मधल्या वाटेवरच्या जागेतही प्रवाशांना खुर्च्या टाकून बसायला जागा दिली जात होती. तसेच केबिनमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले जात होते. यासंदर्भात प्रवाशांनी केलेल्या तक्रारींना उडवून लावले जात होते वा त्यांना दुरुत्तरे केली जात होती.
जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी बसेसविरुद्ध करा तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 11:10 AM