अनुकंपा पदभरती प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करा - विजयलक्ष्मी बिद 

By आनंद डेकाटे | Published: September 21, 2023 07:14 PM2023-09-21T19:14:23+5:302023-09-21T19:14:54+5:30

अनुकंपा तत्वावरील पदभरतीसाठी विभागात विशेष मोहिम राबवून येत्या एक महिन्यात अनुकंपा पदभरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.

Complete compassionate recruitment process within a month says Vijayalakshmi Bid | अनुकंपा पदभरती प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करा - विजयलक्ष्मी बिद 

अनुकंपा पदभरती प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करा - विजयलक्ष्मी बिद 

googlenewsNext

नागपूर: अनुकंपा तत्वावरील पदभरतीसाठी विभागात विशेष मोहिम राबवून येत्या एक महिन्यात अनुकंपा पदभरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या. विभागात अनुकंपा तत्वावरील पाचशे उमेदवार भरतीचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच सर्व विभागप्रमुखांनी भरती प्रक्रियेला गती द्यावी, असेही यावेळी बिदरी यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात अनुकंपा पदाच्या भरतीचा आढावा विभाग आयुक्त बिदरी यांनी घेतला, त्यावेळी त्या बोतल होत्या. बैठकीला आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे (गोंदिया), संजय मीना (गडचिरोली), डॉ. विपीन इटनकर (नागपूर), राहुल कर्डिले (वर्धा), विनय गौडा (चंद्रपूर), योगेश कुंभेजकर (भंडारा), अनुकंपा नियुक्तीच्या विभागीय समन्वयक अधिकारी तथा उपायुक्त (रोहयो) राजलक्ष्मी शहा तसेच विभागातील सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

शासन निर्णयानुसार गट-क व गट-ड मधील सरळसेवेच्या एकूण पदांपैकी २० टक्के पदे अनुकंपाद्वारे भरायची आहेत. महसूल, कृषी, पोलीस, सहकार, आरोग्य, लेखा व कोषागारे, आदिवासी विकास, वन, आरोग्य, समाजकल्याण आदींसह विविध ७० विभागांचा आढावा बिदरी यांनी घेतला. डिसेंबर अखेर विभागात एकूण १,७६९ उमेदवार अनुकंपा प्रतिक्षा यादीत होते. त्यापैकी जून पर्यंत ८२२ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त राजलक्ष्मी शहा यांनी दिली.

Web Title: Complete compassionate recruitment process within a month says Vijayalakshmi Bid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर