मोठ्या पक्षांची चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:10 AM2021-08-26T04:10:19+5:302021-08-26T04:10:19+5:30
एकसदस्यीय प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याला २७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. यासाठी मनपा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली ...
एकसदस्यीय प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याला २७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. यासाठी मनपा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाणार आहे. शहरातील एकूण लोकसंख्येचा विचार करता प्रभागाची लोकसंख्या निश्चित केली जाईल. प्रभागरचनेची सुरुवात उत्तरेकडून सुरू करून दक्षिणेकडे शेवट होईल.
मोठ्या पक्षांची चिंता वाढली
मनपा निवडणूक दोनसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार व्हावी, अशी भूमिका मोठ्या पक्षांची होती. यात आरक्षणात एक जागा गेली तरी दुसऱ्या जागेवर नगरसेवकांना निवडणूक लढण्याची संधी मिळणार होती. मात्र, वॉर्डानुसारच निवडणूक होणार आहे. आरक्षणामुळे अनेकांची संधी हुकण्याची शक्यता असल्याने भाजप व काँग्रेसची चिंता वाढली आहे.
......
अपक्षांचा बोलबाला राहणार
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत चार सदस्यीय प्रभागांमुळे मातब्बर अपक्षांना पराभव पत्कारावा लागला होता. परंतु आता त्यांना पुन्हा संधी निर्माण झाली आहे. त्यात उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करणाऱ्यांची संख्याही मोठी राहील. यामुळे निवडणुकीत अपक्षांचा बोलबाला राहणार आहे.
...
.असे आहे मनपातील संख्याबळ
एकूण नगरसेवक -१५१
भाजपा -१०८
काँग्रेस -२९
बसपा-१०
शिवसेना -२
राष्ट्रवादी काँग्रेस-१
अपक्ष-१
....
विद्यमान प्रभाग व आरक्षण
प्रभाग- ३८
सदस्य संख्या -१५१
महिलांसाठी आरक्षित जागा- ७६
अनुसूचित जमाती ३० जागा, महिलांसाठी १५,
अनुसूचित जाती १२ जागा, महिलांसाठी ६,
ओबीसी ४१ जागा, महिलांसाठी २१
खुला मागासवर्ग ६८ जागा, महिलांसाठी ३४
चारसदस्यीय संख्या ३७ प्रभाग
तीनसदस्यीय संख्या १ प्रभाग
...