लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरही नागपुरात लोकांशी जुळलेल्या समस्या निकाली निघत नाही. गडरलाईन, सिवर लाईन, नाल्याची भिंत आदींसह अनेक मुलभूत मुद्दे आहेत. त्याचे निराकरण करणे आवश्यक आहे. त्याकरिता सत्तापक्षाचे नगरसेवक पुढे येत नाहीत. त्यामुळेच लोकांचा आवाज बुलंद करण्याची जबाबदारी विरोधकांची आहे. मनपाचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्तात काँग्रेसचे नगरसेवक एकत्रित होत नसल्याचे दिसून येत आहे.बुधवारी वनवे यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसच्या नगरसेवकांनी आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली आणि मागण्यांचे निवेदन दिले. त्यांनी दुर्बल घटक समितीच्या सदस्य आणि काँग्रेसच्या नगरसेविका आयशा उईके आणि स्नेहा राजेश निकोसे यांच्या समस्या मांडल्या. बैठकीत सिमेंट रोडचे बंद पडलेली कामे, दुषित पाण्याचा पुरवठा, बगिच्यांची खराब स्थिती, रखडलेली विकास कामे आदींवर चर्चा केली. तानाजी वनवे म्हणाले, आचारसंहिता संपल्यानंतरही कामे होत नाहीत.चर्चेदरम्यान काँग्रेसचे नगरसेवक किशोर जिचकार, दिनेश यादव, आयशा उईके, सैयदा बेगम अन्सारी, भावना लोणारे, नेहा निकोसे, हर्षला साबले, जिशान मुमताज, मो. इरफान अन्सारी, प्रणिता शहाणे उपस्थित होते.निवेदन देताना निवडक नगरसेवकलोकांच्या समस्या मांडण्यासाठी विपक्ष नेते तानाजी वनवे काँग्रेस नगरसेवकांना एकत्रित करू शकले नाही. सभागृहात काँग्रेसचे २९ नगरसेवक आहेत. १७ नगरसेवकांच्या समर्थनाने वनवे विपक्षचे नेते बनले. पण आता हेच नगरसेवक त्यांना विकास कामांवर समर्थन देताना दिसून येत नाहीत. बुधवारी ही स्थिती आयुक्तांना निवेदन देताना दिसून आली. निवेदन देताना वनवेसोबत दिनेश यादव, किशोर जिचकार आणि मनोज साबळे यांच्याशिवाय अन्य दुसरे नगरसेवक नव्हते. महिला नगरसेविकांचे ऐकले जात नसल्यामुळे त्या विरोधी पक्ष नेत्याकडे आल्या. वनवे म्हणाले, आयुक्तांची भेट घेताना १० ते १२ नगरसेवक होते. विरोध एकजूट असून समस्या मांडणार आहे.
लोकांच्या समस्या सोडविण्याठी एकजूट होत नाहीत काँग्रेस नगरसेवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 11:58 PM
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरही नागपुरात लोकांशी जुळलेल्या समस्या निकाली निघत नाही. मनपाचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्तात काँग्रेसचे नगरसेवक एकत्रित होत नसल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देआयुक्त बांगर यांना वनवे यांनी दिले निवेदन