लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी राज्यातील विविध ठिकाणी राजभवनासमोर निदर्शने केली. याअंतर्गत नागपुरातही सदर येथील राजभवनासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी राजस्थानच्या राज्यपालांवर लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप लावत काँग्रेसने निदर्शने केली. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन सादर करीत संवैधानिक संस्थांचा दुरुपयोग बंद करण्याची मागणी करण्यात आली.पालकमंत्री नितीन राऊत, क्रीडामंत्री सुनील केदार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व अनिस अहमद, शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी खासदार गेव्ह आवारी यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना निवेदन सादर केले.आंदोलनात कृष्णकुमार पांडे, नितीन कुंभलकर, संजय दुबे, मुन्ना ओझा, एस.क्यू. जमा, अतुल कोटेचा, मुजीब पठाण, गजेंद्र यादव, नरेंद्र जिचकार, गिरीश पांडव, अभिजित वंजारी, गिरीश पांडव, किशोर गजभिये, कुणाल राऊत, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, दिनेश यादव, परसराम मानवटकर, पुरुषोत्तम हजारे, जुल्फिकार अहमद भुट्टो, किशोर जिचकार, रमेश पुणेकर, कमलेश चौधरी, शादिका निजाम बेगम, महिला शहराध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, इरशाद अली, गजराज हटवार, कुंदा राऊत, एनएसयूआय शहराध्यक्ष आशीष मंडपे, वासुदेव ढोक, सुरेश जग्यासी, फिलीप जायस्वाल, अजित सिंह, धीरज पांडे, सुरेश पाटील, विजयालक्ष्मी हजारे, ज्योती खोब्रागडे, तनवीर विद्रोही, नीलेश खोरगडे, प्रणित जांभुुळे, पीयूष वाकोडीकर, जयंत जांभुळकर, विनोद सोनकर आदी सहभागी झाले होते.
काँग्रेसची भाजपविरुद्ध राजभवनासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 11:21 PM
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी राज्यातील विविध ठिकाणी राजभवनासमोर निदर्शने केली. याअंतर्गत नागपुरातही सदर येथील राजभवनासमोर निदर्शने करण्यात आली.
ठळक मुद्देराजस्थानमधील घटनाक्रमाचा निषेध : राज्यपालांना निवेदन सादर