काँग्रेस वॉर्डनिहाय कोविड सहायता केंद्र सुरू करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:09 AM2021-04-11T04:09:15+5:302021-04-11T04:09:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे लोकांना प्रत्यक्ष मदत व्हावी, या उद्देशाने वॉर्डनिहाय कोविड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे लोकांना प्रत्यक्ष मदत व्हावी, या उद्देशाने वॉर्डनिहाय कोविड सहायता केंद्र, हेल्पलाइन कमिटी स्थापन करा, असे निर्देश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ब्लॉक अध्यक्षांना दिले.
शनिवारी आ. विकास ठाकरे यांच्या निवासस्थानी पटोले यांनी काँग्रेसच्या सर्व ब्लॉक अध्यक्षांची बैठक घेतली. यावेळी आ. अभिजित वंजारी, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यात रक्तसाठ्याची मोठी टंचाई आहे. यामुळे महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात यावे, असे निर्देशही दिले आहेत.
चौकट
गडकरी यांच्या कार्यालयातर्फे
विधानसभा मतदारसंघनिहाय मदत केंद्र
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयामार्फत नागपुरात विधानसभा मतदारसंघनिहाय मदत केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रांमार्फत रुग्णांसाठी बेड्सची उपलब्धता तसेच औषध मिळण्यास येणाऱ्या अडचणी सोडवल्या जातील.