उपराजधानीत संविधान दिन उत्साहात;संविधान प्रास्ताविकेचे वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 10:54 AM2019-11-28T10:54:22+5:302019-11-28T10:54:44+5:30

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान राष्ट्राला अर्पण केले. त्यानिमित्त शहरातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Constitution Day celebrates in the sub-capital ; reading the introduction of the constitution | उपराजधानीत संविधान दिन उत्साहात;संविधान प्रास्ताविकेचे वाचन

उपराजधानीत संविधान दिन उत्साहात;संविधान प्रास्ताविकेचे वाचन

Next
ठळक मुद्दे बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान राष्ट्राला अर्पण केले. त्यानिमित्त शहरातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नागरिकांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली.

डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन
डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा व सत्र न्यायालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. जे. मंत्री, न्या. सुभाष कराडे, ज्येष्ठ अ‍ॅड. राजेंद्र पाटील, संघटनेचे अध्यक्ष कमल सतुजा, सचिव अ‍ॅड. नितीन देशमुख व इतर सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.

रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन
अ.भा. रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनतर्फे संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला फेडरेशनचे राष्ट्रीय संघटक प्रा. मधुकर टेंभुर्णे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक कोल्हटकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डॉ. अनमोल टेंभुर्णे, मधुकर मडामे, सचिन टेंभुर्णे, प्रभाकर कांबळे, राजेंद्र कांबळे, पमिता कोल्हटकर, शिशुपाल कोल्हटकर, भारती डोंगरे आदी उपस्थित होते.

मनपा मागासवर्गीय कर्मचारी संघटना
महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे संघटनेचे सचिव अशोक कोल्हटकर, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, अभियंता उज्ज्वल लांजेवार, गौतम पाटील, राजेश हाथीबेड, विनोद धनविजय, विशाल शेवारे, दिलीप तांदळे, राजकुमार वंजारी, संजय बागडे, राजेश वासनिक, सचिन टेंभुर्णे, डोमाजी भडंग, शशिकांत आदमने, सुशील यादव, वंदना धनविजय, राकेश चहांदे, शिवशंकर गौर यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला.

टायगर ऑटोरिक्षा संघटना
संविधान दिनानिमित्त विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांच्या नेतृत्वात संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी वाहतूक नियमांचे पालन करण्याची शपथ ऑटोचालकांनी घेतली. राजू इंगळे, आनंद चौरे, रवि तेलरांधे, प्रिन्स इंगोले, जावेद शेख, रवि सुखदेवे, प्र्रकाश साखरे, किशोर बांबोले आदी उपस्थित होते.

नॅशनल पीपल्स सोशल ऑर्गनायझेशन
नॅशनल पीपल्स सोशल ऑर्गनायझेशनच्यावतीने उंटखाना चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी डॉ. विठ्ठलराव कोंबाडे, संघटनेचे अध्यक्ष राजेश ढेंगरे, माजी नगरसेविका सुजाता कोंबाडे, सुजाता सुके, लता नगरारे, गीता लूटे, मीरा गजभिये, करुना ढेंगरे, संजय मून, आश चवरे, संगीता खापर्डे, जयदेव पाटील, डॉ. राजाभाऊ टांकसाळे आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन
अ.भा. रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनतर्फे संविधान चौकस्थित भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला अभिवादन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. फेडरेशनचे राष्ट्रीय संघटक प्रा. मधूकर टेभूर्णे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक कोल्हटकर यांच्यासह डॉ. अनमोल टेभर्णे, मधूकर मडामे, सचिन टेंभूर्णे, प्रभाकर कांबळे, राजेंद्र कांबळे, पमिता कोल्हटकर, शिशुपाल कोल्हटकर, भारती डोंगरे, छाया खोब्रागडे, अर्चना सूखदेव, सुनंदा कोचे, जयंत शेंडे, प्रकाश टेंभूर्णे, प्रदीप बन्सोड, प्रमोद राऊत, दिनेश घरडे, मनोज शेंडे, सूनिल गणवीर, नंदा गळवी, दिप्ती नाईक आदी उपस्थित होते.

सिव्हिल राईटस् प्रोटेक्शन सेल
सिव्हिल राईटस् प्रोटेक्शन सेलतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद जीवने यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. टी. जी. गेडाम, सूर्यभान शेंडे, डॉ. किरण मेश्राम, डॉ. मनीषा घोष, बबीता वासे, माधवी जांभुळकर, संगीता पाटील, चंद्रिकापुरे, डॉ. राजेश नंदेश्वर आदींच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला.

अखिल भारतीय धम्मसेना
अखिल भारतीय धम्मसेनेच्यावतीने भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी रवी मेंढे यांच्यासह शैलेश सवाईथूल, अशोक गोवर्धन, नवीन वाघमारे, दर्पण बोरकर, निखील डोंगरे, राजेश धुर्वे, विजेंद्र गजभिये, स्वप्निल मेश्राम, दिवांत वाघमारे, सुशीला चवरे, आरती जनबंधू, प्राची जाधव, अलका साखरे आदी उपस्थित होते.

भीमज्योती बुद्ध विहार महिला समिती
नवीन बाभुळखेडा येथील भीमज्योती बुद्ध विहार महिला समितीच्यावतीने भारतीय संविधान प्रास्ताविकेचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी जया शंभरकर, शुद्धता गवळी, प्रतिमा डोंगरे, वंदना शंभरकर, आशा बुलकुंडे, इंदीरा शंभरकर, वैशाली वाघमारे, अरुणा डोंगरे आदी उपस्थित होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शहरच्यावतीने उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष धनराज फुसे, शहर महासचिव अरविंद ढेंगरे, शहर अध्यक्ष अनिल अहिरकर व प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महेंद्र भांगे, श्रीकांत शिवणकर, सुनील लांजेवार, भीमराव हाडके, देवीदास घोडे आदी उपस्थित होते.

Web Title: Constitution Day celebrates in the sub-capital ; reading the introduction of the constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.