सावित्री प्रबोधनी मंच काशीनगरच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. मंचाच्या मुख्य संयोजिका पूजा भस्मे यांच्या मार्गदर्शनात झालेल्या कार्यक्रमात काशीनगर ते त्रिशरण चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली व नंतर प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी किशोरी वैरागडे, बिंदू वासनिक, संगीता वासनिक, दीपा थूल, देवयानी पाटील, रोशनी वैरागडे, नीलिमा चहारे, ज्योती झोडापे, रजनी पाटील, शालिनी पाटील, प्रतीक्षा चाहांदे, कल्पना गायकवाड, निशा गायकवाड, नूपुर भस्मे, शालिनी वानखेडे आदींचा सहभाग होता.
ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालय
संविधान दिनाचे औचित्य साधून ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने संविधान प्रास्ताविकेवर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पुणे येथील आयकर विभागाच्या उपयुक्त क्रांती खोब्रागडे मुख्य मार्गदर्शक म्हणून सहभागी होत्या. यावेळी माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, महाविद्यालयाचे अध्यक्ष चंदनसिंह रोटेले, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, आयकर उपयुक्त डॉ. जीवन बच्छाव आदी उपस्थित होते. संचालन व प्रास्ताविक प्रा. महेंद्रकुमार मेश्राम यांनी केले. प्रा. शालिनी तोरे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. कल्पना मुकुंदे यांनी आभार मानले.