लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोशल मीडियावर होणाऱ्या न्यायालयाच्या अवमानासंदर्भातील जनहित याचिकेवर २७ मार्च रोजी अंतिम निकालासाठी सुनावणी निश्चित केली आहे. प्रकरणातील संबंधित पक्षकारांनी आपापली लेखी उत्तरे न्यायालयात सादर केली आहेत.काही महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नावाने फेसबुक पेज सुरू करण्यात आले होते. त्यावर न्यायालयाविषयी अतिशय खालच्या भाषेत पोस्टस् टाकल्या जात होत्या. त्या पेजमुळे न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धक्का बसत होता. ही बाब निदर्शनास येतपर्यंत सुमारे तीन लाख फेसबुक युजर्सनी या पेजला भेट दिली होती. परिणामी उच्च न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली व याचिकेचे काम पाहण्यासाठी अॅड. श्रीरंग भांडारकर यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली. दरम्यान, प्रकरणात केंद्र सरकारसह फेसबुक, टिष्ट्वटर, यूट्यूब व गुगल यांना प्रतिवादी करण्यात आले.
सोशल मीडियावर न्यायालयाचा अवमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:57 PM
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोशल मीडियावर होणाऱ्या न्यायालयाच्या अवमानासंदर्भातील जनहित याचिकेवर २७ मार्च रोजी अंतिम निकालासाठी सुनावणी निश्चित केली आहे. प्रकरणातील संबंधित पक्षकारांनी आपापली लेखी उत्तरे न्यायालयात सादर केली आहेत.
ठळक मुद्देहायकोर्ट : २७ ला निर्णयासाठी सुनावणी